You are currently viewing कणकवली लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी वतीने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी वतीने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कै. प्रमोद परब यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन..

 

कणकवली :

 

कणकवली तालुक्यातील लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या वतीने कै. प्रमोद परब यांच्या स्मरणार्थ मागील अनेक वर्षे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. ह्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचा शुभारंभ हळवल उपसरपंच सान्वी गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हा रुग्णालय रक्त पेढी चे डॉ. पल्लवी सुरवसे, अधीपरिचारिका प्रांजली परब, रक्तपेढी तंत्रज्ञ मयुरी शिंदे, सहाय्यक मंदा तावडे, कळसुली आरोग्य सेवक श्री पाटील, मंडळाचे अध्यक्ष लवू परब, माजी उपसरपंच अरुण राऊळ, उपाध्यक्ष भरत गावडे, सचिव, दिपेश परब, खजिनदार गणेश गावडे, दिपक राऊळ, सुरेश डोंगरे, प्रथमेश घाडी, आशा सेविका प्रियांका तावडे, दशरथ परब, किरण राऊळ विकास गावडे, शिवा राणे, प्रशांत गावडे, मंगेश गावडे, गिरीश परब, अनिकेत परब, सतीश गावडे, राजेंद्र गावडे, कृष्णा राऊळ, नितेश राऊळ, रोहन राणे, सिद्धेश परब, विद्धेश शेलार, ऋषी गावडे, ऋषी राऊळ, प्रथमेश राणे, संदीप राणे, ओंकार मडवळ, हर्षवर्धन गावडे, अक्षय मोरये आदींसह मंडळाचे कार्यकर्ते व रक्तदाते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 1 =