You are currently viewing करवीरनिवासिनी श्रीमहाक्ष्मी

करवीरनिवासिनी श्रीमहाक्ष्मी

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठा पैकी कोल्हापूरची महालक्ष्मी ही एक आद्यशिक्ती व पूर्ण पीठ आहें. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर मधेच हे मंदिर साठी आहें. हे मंदिर सातव्या शतकात चालुक्य राजांनी बांधले आहें. हे तीर्थस्थान मातृक क्षेत्र म्हणजे करविर मातृपूजेचे आद्यक्षेत्र व शक्ती उपासक आहें म्हणून यास दक्षिणकाशी म्हणून ओळखले जाते.
कोल्हापूर महास्थांननं यत्र लक्ष्मी सदा स्थिता l मातु : पुरु द्वितीयनं च, तुळजापूर तृतीय स्थानम ll यां वर्णना प्रमाणे महालक्ष्मी आहें. ही देवी अंबा बाई, जगदंबा यां नावाने पण ओळखले जाते.
पद्म पुराण, स्कंद पुराण, मार्कंडेय पुराणं तसेच देवी भागवता मध्ये ही हया देवीचा व मंदिराचा उल्लेख सापडतो. सातव्या शतका पासून अनेक राजांनी कोल्हापूर वर राज्य केले आणि मंदिराची देखभाल व बांध काम केल्याचे. इतिहासा त उल्लेख आहें.
महालक्ष्मी मंदिर हे उत्कृष्ट स्थापत्य शाश्त्राचा नमुना आहें. यां मंदिराची रचना हेमाडपणती आहें. मंदिरात वायुवीजणासाठी दगडी झरोके आहेत. महालक्ष्मी मंदिराचा, मुख्य गाभाऱ्याचा प्रदक्षिणा मार्ग श्री यंत्रा प्रमाणे सोळा काटकोनात विभागण्यात आला आहें. याचा जो सर्वोच्य मध्यंबिंदू वर महालक्ष्मी ची मूर्ती स्थापन करण्यात आली आहें. ही मूर्ती 2 फूट 9 इंच उंचीची आहें. ही मूर्ती चतुरभुजा आहें. वरच्या उजव्या हातात गदा व डाव्या हातात खेटक म्हणजेच ढाल आहें. खालच्या उजव्या हातात म्हाळुंग आहें तर डाव्या हातात पाणपत्र आहें. मस्तकावर तीन वेटोळ्या चष्मा नाग आहें व त्याचा फणा पुढच्या बाजूस आहें. त्या फण्याच्यामागे लिंगा व योनी ही प्रकृती तत्वे आहेत.
हे मंदिर दोन मजली आहें असे क्वचितच आढळते. वरच्या मजल्यावर देवीच्या डोक्यावर महादेवाचे लिंग प्रस्थापित आहें. प्रदक्षिणा मार्गात महाकाली, महासरस्वती, महादेव, गणपती यांची मंदिरे आहेत. महालक्ष्मी, माहाकाली, महासरस्वती, गणपती मंडप व गरुड मंडप असे बांधकाम करण्यात आलेले आहें. मुख्य गाभाऱ्यात उंच दगडी चबुतरा बांधलेला असून त्यावर देवींची मूर्ती विराजमान आहें. गाभाऱ्यात दहा दगडी खांब असून वरती लाकडी मेघडंबरी आहें.
अलीकडेच एक लेख वाचनात आला होता 125 वर्षांपूर्वी कोल्हापूर शहरात वीज नव्हती. त्यावेळी रस्त्यावर, चौकात रॉकेलचे दिवे लावत असत. त्यावेळी. महालक्ष्मी मंदिरात तेलाचे व तुपाचे दिवे लावत असत त्यामुळे मंदिर आणि पूर्ण परिसर उजळून निघत असे. मंदिरातील सेवेकरी रोशन नाईक हे काम करीत असत.
मंदिरात 43 तेलाचे दिवे होते तर 84 कंदील होते. देवीच्या मुख्य दरवाजात दोन पितळी कंदील आहेत त्यांना दोन शेर तेल लागत असे. देवीच्या उजव्या बाजूला एक पितळी नंदादीप अखंड तेवत असतो. त्याच्या प्रकाशात देवीचे रत्नजडीत सुवर्ण अलंकार,देवीचे तेजोमय रूप पाहायला मिळत असे. आरतीच्या वेळी मशाल पेटवली जात असे. पालखीच्या वेळी पाच मधली पेटवत व त्या उजेडात पालखी फिरवण्यात येई. पालखीच्या वेळी प्रथम मन रोशन नाईक यांना दिला जात असे.
अंबाबाईच्या दर्शनाला रोज हजारो भाविक येतात. तिरुपतीचे दर्शन घेतल्या नंतर महालक्ष्मी चे दर्शन घेण्याची प्रथा आहें.

कल्पना तेंडुलकरओरोस.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 4 =