You are currently viewing शिर्षक – वसंतोत्सव दारी

शिर्षक – वसंतोत्सव दारी

*ज्येष्ठ लेखक कवी पत्रकार संपादक बाबू फिलिप्स डिसोजा लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शिर्षक- वसंतोत्सव दारी*

 

मधुमालतीचा वेल बहरला

नाजुक जाईचा गंध पसरला

सोनचाफा फुले वृक्ष डवरला

माझिया अंगणी वसंत फुलला

-१-

प्राजक्ताचा सडा तळी विखुरला

जास्वंदाचा तुरा मंद तो डोलला

माझिया अंगणी वसंत फुलला

आम्रवृक्ष मत्त धुंद मोहोरला

-२-

निष्पर्ण झाडावरी चाफा झुलला

माझिया अंगणी वसंत फुलला

देव देव्हारी भक्ती सूर झरला

यौवन मनी प्रेम रंग भरला

-३-

माझिया अंगणी वसंत फुलला

कोकीळाने मधुर स्वर धरला

मधुस्तव भ्रमर गुंजारवला

श्रवता निसर्गाने ताल धरला

-४-

उधळण रंगगंधांची भूतला

फुलपाखरांचे भ्रमण चंचला

रंगांचा सोहळा सृष्टी विस्तारला

माझिया अंगणी वसंत फुलला

-५-

-बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर

हिमगौरी बिल्डिंग२१ सेक्टर२१ स्कीम१०

यमुनानगर निगडी पुणे-४११०४४

मो. 9890567468

प्रतिक्रिया व्यक्त करा