मध्य महाराष्ट्रासह विदर्भात येत्या दोन दिवसात पाऊस

मध्य महाराष्ट्रासह विदर्भात येत्या दोन दिवसात पाऊस

पुणे

मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात पुढील दोन दिवसांत तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने बुधवारी वर्तविली. पुण्यात बुधवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले होते. पुढील दोन दिवसांमध्ये आकाश निरभ्र राहून कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असा अंदाजही वर्तविला आहे.

पुण्यात बुधवारी कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २.३ अंश सेल्सिअसने वाढून ३९.५ अंश सेल्सिअस नोंदला. राज्यात सर्वांत कमाल तापमान अकोला येथे ४२.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. राज्यातील वातावरणात बदल होऊ लागले आहेत. काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ होत असल्याने कमाल तापमानात वाढ होत आहे.

उद्यापासून (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा