You are currently viewing पितृपक्ष… नवा विचार ..
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

पितृपक्ष… नवा विचार ..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

*पितृपक्ष… नवा विचार ..*

विश्वास ठेवा अगर ठेवू नका,हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक
श्रद्धेचा व संस्कारांचा प्रश्न आहे. मी श्रद्धावान आहे पण अंधश्रद्ध नाही तरी जीवनात कधी कधी असे अनुभव येतात
की खरे काय खोटे काय याचे उत्तर मिळत नाही. मी दुसऱ्याने
सांगितलेल्या गोष्टी तात्पुरत्या स्मरणात ठेवून नंतर विसरून
जाते पण स्वत:ला जे घडले ते कसे विसरायचे ? विज्ञान युगात
विज्ञानाच्या कसोटीवरच सारे पारखून घ्यायला हवे हे १००% खरे असले तरी काही अनाकलनीय अनुभव येतात त्यांची संगती कशी लावायची? हा मोठा प्रश्न पडतो. मी विज्ञानवादी
असले तरी भारतीय अध्यात्म पुराणे यांचा पगडा माझ्या मनावर असून त्या संस्कारां बाहेर जाऊन विचारही करू शकत
नाही इतके ते आपल्या पासून अभिन्न असतात .म्हणूनच मन
दोलायमान असते, त्याला उत्तर मिळत नाही.

या संदर्भात एक मला आलेला अनुभव मी सांगते आहे. २००८
साली आम्ही उभयता इंग्लंड मध्ये स्थाईक(सायकिॲट्रीस्ट)
मुलाकडे पाच महिने मुक्कामाला होतो.पितृपक्ष आला नि मी
(संस्कार, त्याला काय करणार?)एकदम हबकले. पितृपक्ष नि
इंग्लंड मध्ये? करू की नको? मी तर भारतात नाही ? काय
करावे? ठरवले , न करून आपल्याला चालणार नाही, चैन
पडणार नाही. मग करायचा स्वयंपाक साग्रसंगित.
मुलागा सकाळी तेथिल ८ :१५ वाजता हॅास्पिटलला जातो, त्याच्या आत स्वयंपाक होईल का? पहाटे चारलाच उठले नि
भराभरा कामाला लागले कारण मुलाच्या हातून आजोबा आजी जेवले पाहिजेत. त्यांच्या आपल्या घड्याळात ४ ते ५
तासांचा फरक आहे. मी भारतात माझे सासरे ११ते १२ च्या
दरम्यान जेवायचे ती वेळ पाळते. आणि आठच्या ठोक्याला
सर्व तयारी करून ताटे तयार केली व अंगणात जाऊन विस्तवावर मुलाकडून नैवेद्य अर्पण केला. तूप धूप सारे करविले व मन शांत झाले. नक्कीच ते इथे ही जेवायला आलेच असतील या समाधानात किचन मध्येच आराम खुर्चीवर माझा
बसल्या बसल्या डोळा लागला. नि बघते तर काय? माझे
सासू सासरे तृप्त मनाने पानावर बसून मोठ्या आनंदात जेवत
होते.खुशित होते. मला खडबडून जाग आली नि मी आश्चर्याने
थक्क तर झालेच पण कृतार्थ ही झाले. वा , इथे ही अण्णा जीजा जेवायला आलेत तर ..! धन्य धन्य वाटले.ते हयात
असतांनाही मी नेहमीच त्यांना आदराने वागवून कधीच त्यांची
उपेक्षा केली नाही. कारण मला पक्के माहित आहे आपल्या
सर्वांची वाट एकच आहे.

हा किस्सा वाचून कुणाला राग ही येऊ शकतो मला माहित आहे. या संदर्भात डॅा. आनंदीबाई जोशी पहिल्या,अमेरिकेत
जाऊन बनलेल्या डॅाक्टर यांची ही, त्यांची सवत , गोपाळराव
जोशी यांची प्रथम पत्नी , आनंदी बाईंच्या स्वप्नात आल्याची
नोंद त्यांनी करून ठेवली आहे.

आता मी जेव्हा विचार करते तेव्हा , समजा , ह्या प्रथा नसत्या
तर आपण आपल्या पूर्वजांची कितपत आठवण काढली असती हा प्रश्न मला पडतो. त्या निमित्ताने आपल्या पुढच्या
पिढीला मागच्या पिढीचे स्मरण होऊन त्यांच्या कार्याची उजळणी होणे आवश्यक नाही काय ? हो तर , आहेच.
नुकतीच वाचनात आलेल्या (नाव माहित नाही)एका पोष्ट
वरून …..
शिवाय आपले पूर्वज अतिशय हुशार होतेच.कदाचित विज्ञान
दृष्टी ही आपल्या पेक्षा त्यांच्या जवळ जास्तच होती. म्हणून वड व पिंपळ….
ही सर्वाधिक ॲाक्सिजन देणारी व पक्ष्यांना अत्यंत उपयुक्त
अशा झाडांची पैदास फक्त कावळ्यांच्या विष्ठेतून, जे वड
पिंपळाची फळे व तुर्रे खातात ,फक्त कावळेच बरं ही फळे
खातात, बाकी पक्षी नाही, तर ह्या कावळ्यांची विष्ठा जिथे
जिथे पडते तिथेच फक्त वड पिंपळाची झाडे उगवतात( हे
आपल्याला सर्व सामान्य माणसांनाही माहित आहे).हे
ज्ञान आपल्या हुशार पुर्वजांना व साधू संतांना होते व भाद्रपद
हाच कावळ्यांचा प्रजनन काळ असून ह्या काळातच कावळ्यांना “घास” रूपी नैवेद्य व पौष्टिक खाद्य मिळावे
अशी आपल्या पूर्वजांनी योजना करून ठेवलेली असतांना
आपण आपल्या चांगल्या प्रथांची खुशाल खिल्ली उडवतो
ही अत्यंत अशोभनिय गोष्ट आहे हे लक्षात ठेवा.वड पिंपंळ
लावले की हजारो पक्षी तिथे निवास करतात ही सुद्धा जमेची
बाजू नाही काय ? आपल्या सर्व जुन्या प्रथांच्या मागे वैज्ञानिक
दृष्टी आहे हे लक्षात घ्या. आपणच त्या प्रथांचे अवमुल्यन केले
व टिंगलीचा विषय बनविला , हे ही तितकेच खरे आहे .
म्हणून आपल्या प्रत्येक प्रथे मागील विज्ञान जाणून घेणे
गरजेचे आहे असे मला वाटते.कावळा हा शहर स्वच्छ
ठेवणारा अत्यंत हुशार पक्षी आहे व तो अत्यंत स्वयंभू आहे.
काही मागत नाही , स्वत:च्या हिंमतीवर जगतो,अध्यात नाही
मध्यात नाही, एकी तर प्रचंड शिकण्या सारखी! क्षणात गाव
गोळा करतात , एकमेकांना मदत करतात.माणसाची मदत
मागत नाही की घेत नाही! कावळ्याकडून माणसाने बरेच
शिकण्या सारखे आहे.म्हणूनही त्याचा आदरच केला पाहिजे,
नाही का?

शिवाय या प्रथेमुळे गरिबातला गरीबही पुर्वजांसाठी का होईना
त्या निमित्ताने मिष्टांन्न भोजन बनवून दोन घास सुखाचे खाऊन
त्या कष्टकऱ्याचा अंतरात्मा तृप्त होतो ही देखिल जमेची बाजू
नाही काय?

तर मंडळी ..

ही फक्त नि फक्त माझी मते आहेत ..
खूप खूप धन्यवाद मंडळी ..

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १२/०९/२०२२
वेळ : रात्री १० वाजता.

Advertisement

*⚛️प्रवेश मार्गदर्शन सुरू⚛️*

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*

*_🥳१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…👩‍💻_*

*🛑उपलब्ध शिक्षणक्रम:-*
🔸बी. ए.
🔹बी. कॉम.
🔸एम. कॉम.
🔹एम. बी. ए.
🔸रूग्ण सहायक
🔹एम.ए. (अर्थशास्त्र)
🔸एम.ए. (लोक प्रशासन)
🔹एम.ए. (इंग्लिश)
🔸एम.ए. (हिंदी)

*# सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र #*

*📜प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-👇*

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*

*📲मोबा. 8605992334*

*Web link*

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 9 =