You are currently viewing शिवसेना कवठी शाखा व कवठी ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम

शिवसेना कवठी शाखा व कवठी ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम

*शिवसेना कवठी शाखा व कवठी ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम*

*लोकवर्गणीतून गावातील रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप*

*आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले लोकार्पण*

शिवसेना कवठी शाखा व कवठी ग्रामस्थांच्या वतीने लोकवर्गणीतुन गावातील गरजू रुग्णांना आवश्यक वस्तू खरेदी करून त्याचे लोकार्पण कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये व्हीलचेअर, पेशंट कॉट, कमोर्ड खुर्ची, त्रीव्हीलर सायकल, वॉकर, आदी साहित्य रूग्णांना मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी आ. वैभव नाईक यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. कवठी गावातील शिवसैनिकांनी स्वखर्चातून पै. पै. गोळा करून हा उपक्रम राबविला. हीच खरी शिवसेनेची ताकद आहे. शिवसेनेतून कितीही लोक गद्दारी करून निघून गेले तरी कवठी गावातील शिवसैनिकांसारखे शिवसैनिक असल्यानेच आज शिवसेना वादळात देखील ठामपणे उभी आहे. असेच उपक्रम शिवसैनिकांनी ५७ वर्षे राबविल्यामुळे शिवसेना आज भाजप सारख्या महाशक्तीच्या विरोधात लढत आहे. तर माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता दोनवेळा आमदार झाला. सामान्य लोकांना मी कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. कितीही आमिषे आली तरी पक्षाशी गद्दारी करणार नाही. शिवसेना पक्षाबरोबर ठाम राहणार आहे. विधानसभेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा व उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा संकल्प करूया असे आवाहन त्यांनी केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते म्हणाले, कवठी गावातील शिवसैनिकांनी अशा प्रकारच्या उपक्रमातून कवठी गावातील शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित ठेवला आहे. कवठी गावातील रुग्नांना अशी सेवा देण्याचा उपक्रम प्रथमच होत असून रुग्नांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे उपक्रम आदर्शवत असल्याचे संजय पडते यांनी सांगितले.

कवठी ग्रा.प. सदस्य नंदकिशोर वाडयेकर हे झाडावरून पडून जखमी झाले असून आ. वैभव नाईक ,संजय पडते यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन विचारपूस केली.

यावेळी कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, कवठी उपसरपंच ऋतुजा खडपकर,ग्रा. प सदस्य सविता बांदेकर, माजी सरपंच पूनम पार्सेकर,मंगेश बांदेकर, श्रिया जोगी,दादा गुरव,प्रशांत बांदेकर, मंगेश कवटकर,रुपेश वाडयेकर,दीपक सांगळे,अरुण परुळेकर,संजय करलकर,दिनेश गोरे,संचिता फडके,रुपेश खडपकर,यामिनी योगी, श्रीकृष्ण योगी,संतोष वाडयेकर, मयुरेश वाडयेकर,अनिल चितकर,संध्या वाडयेकर,राकेश वस्त,प्रकाश राणे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा