You are currently viewing सावंतवाडीत मतदानासाठी प्रशासन सज्ज

सावंतवाडीत मतदानासाठी प्रशासन सज्ज

सावंतवाडी :

 

तळकोकणात रत्नागिरी – सिंधुदुर्गसाठी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ३०८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी मतदान प्रक्रियेची सर्व तयारी पूर्ण झाली असून आज सावंतवाडी येथून कर्मचारी ईव्हीएम मशीन व इतर मतदान सामुग्री घेऊन आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाली‌. याबाबतची माहिती सावंतवाडीचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली.

ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी १३०० शासकीय कर्मचारी यंत्रणेत घेण्यात आले असून ६०० पोलीस कॉन्स्टेबल कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी २०० महसुल विभागाचे कर्मचारी सतत राबत आहेत. सावंतवाडी मतदारसंघात एकूण २ लाख २४ हजार ४२१ मतदार आहेत. ८५ वर्षावरील मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून ८५ वर्षावरील एकूण ५२६ मतदारांपैकी ४८८ मतदारांनी मतदान केले आहे. तर ९०० पोस्टल मतदानापैकी ८४४ लोकांनी पोस्टल मतदान केले आहे. पोस्टल लोकांचे व ८५ वर्षावरील मतदारांचे सावंतवाडीत सर्वाधिक ९५ टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात ४२ सेक्टर पोलीस ऑफिसर असून मायक्रो ऑब्झर्वर ४० आहेत. कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी ४० बसेसची सोय करण्यात आल्याचे प्रांताधिकारी श्री.निकम यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा