You are currently viewing कुडाळ पंचायत समितीचा आदर्श..

कुडाळ पंचायत समितीचा आदर्श..



एकाच दिवसात तालुक्यात १०८१ वनराई बंधारे

 

कुडाळ :

कुडाळ पंचायत समितीने ‘बंधारा दिवस’ साजरा करून १०८१ बंधारे बांधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे. गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे कौतुक होत आहे. जमिनीवरील वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी कुडाळ तालुक्यात उभी राहिलेली लोकचळवळ कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी काढले.

या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी पावशी मिटक्या ची वाडी येथे डॉ. हेमंत वसेकर यांच्या उपस्थित झाला. त्यानंतर तालुक्यात लोकसहभागातून १०८१ बंधारे बांधून जिल्ह्यातील आदर्श पंचायत समिती म्हणून कुडाळ पंचायत समितीने नावलौकिक मिळविला आहे.

या उपक्रमात सभापती नूतन आईर, उपसभापती जयभारत पालव, जिल्हापरिषद सदस्य रणजित देसाई,  अमरसेन सावंत, पंचायत समिती सदस्य राजन जाधव, संदेश नाईक, सरपंच बाळा कोरगावकर, उपसरपंच दीपक अंगणे, पावशी माजी सरपंच पप्या तवटे, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, जलसंधारण अधिकारी विवेक नानल, जलसंधारण अभियंता आर जी चोडणकर, कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, बाळकृष्ण परब, विस्तार अधिकारी सखाराम सावंत, दत्‍ताराम आंबेकर, महादेव खरात, मंदार पाटील, अमित देसाई आदी सहभागी झाले होते.

या उपक्रमाची माहिती देताना गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी शासनाने याची दखल घेऊन बंधारा दिवस हा कुडाळ पॅटर्न राज्यस्तरावर राबविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

डॉ. हेमंत वसेकर यांनी नेरूर वासुसेवाडी येथील बंधाऱ्याला भेट देऊन माहिती घेतली. सरपंच शेखर गावडे यांनी त्यांचे स्वागत केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + fifteen =