नोकरी-व्यवसायानिमित्त गोव्याला ये-जा करणाऱ्या युवकांना दिलासा..

नोकरी-व्यवसायानिमित्त गोव्याला ये-जा करणाऱ्या युवकांना दिलासा..

*सुधा कवठणकर यांचे मानले युवकांनी आभार*

*फुकाचे श्रेय घेण्याचा इतरांचा प्रयत्न*

सावंतवाडी :

Covid-19 च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या कडक निर्बंधांमुळे सिंधुदुर्ग – गोवा सीमा बंद झाली, त्यामुळे शेजारील गोवा राज्यात नोकरी-व्यवसायानिमित्त ये जा करणाऱ्या सिंधुदुर्गातील युवकांची गैरसोय झाली. अखेर सातार्डा  येथील शिवसेनेचे कार्यकर्ते सुधा कवठणकर यांच्या प्रयत्नामुळेच सातार्डा येथील पोलीस चेकपोस्ट वर ग्रामपंचायतीच्या प्रमाणपत्रावर गोव्यात नोकरी-व्यवसायानिमित्त जाणाऱ्या युवकांसाठी खुले झाले. त्यामुळे आरोंदा, बांदा, दोडामार्ग येथीलही चेक पोस्ट आरोग्य तपासणी नंतर खुले करण्यात आले. दरम्यान, सातार्डा येथील कडव्या शिवसैनिकाने केलेल्या प्रयत्नाचे श्रेय इतर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेण्याचा प्रयत्न केला.

लॉक डाऊन मुळे प्रशासनाचे कडक निर्बंध आले. सिंधुदुर्गातील गोवा लगतच्या गावातील अनेक युवक नोकरी-व्यवसायानिमित्त गोव्यात ये जा करत असतात. सिंधुदुर्ग गोवा सीमा बंद झाल्याने सातार्डा पोलीस चेक पोस्ट येथे युवकांची गर्दी झाली. यावेळी तिथे शिवसेनेचे कार्यकर्ते सुधा कवठणकर पोचले. युवकांशी त्यांनी चर्चा केली.  पत्रकार तथा सातार्डा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय पिळणकर हेही नोकरी-व्यवसायानिमित्त गोव्याला जाणाऱ्या युवकांसाठी चेक पोस्ट खुले करण्यासाठी आग्रही राहिले. सुधा कवठणकर यांनी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, युवा सेनेचे सागर नानोस्कर यांच्याशी संपर्क साधल्यावर, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीच्या प्रमाणपत्रावर, चेक पोस्टवर आरोग्य तपासणी करत नोकरी-व्यवसायानिमित्त गोव्याला जाणाऱ्या युवकांसाठी सिंधुदुर्ग गोवा सीमा खुली झाली. सातार्डा पोलीस चेक पोस्ट खुले झाल्यावर आरोंदा, बांदा, दोडामार्ग येथीलही सीमा खुल्या झाल्या.

सुधा कवठणकर यांच्या प्रयत्नामुळे नोकरी-व्यवसायानिमित्त गोव्याला जाणाऱ्या युवकांना दिलासा मिळाला. या युवकांनी सुधा कवठणकर यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा