You are currently viewing अष्टपैलू गुण असलेला शिक्षक म्हणजे पराडकर सर – अशोक पाडावे यांचे गौरवोद्गार

अष्टपैलू गुण असलेला शिक्षक म्हणजे पराडकर सर – अशोक पाडावे यांचे गौरवोद्गार

सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक शंकर उर्फ अण्णा पराडकर यांचा संस्थेतर्फे भव्य सत्कार

तळेरे

आचऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूलमध्ये शंकर पराडकर यांनी २१ वर्षे क्रीडाशिक्षक व विषयशिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करताना त्यांनी क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटिवला असून त्यांच्यातील वैशिष्ट्य पुर्ण कौशल्यमुळे विद्यालयाच्या नावलौकिकात अधिक भर पडली आहे.अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला शिक्षक आमच्या शाळेला लाभले हे गावाचे व शाळेचे भाग्य म्हणावे लागेल असे गौरवोउदगार सेवानिवृत्त शिक्षक अण्णा पराडकर यांच्या निरोप समारंभ प्रसंगी मुंबई कमिटीचे सचिव अशोक पाडावे यांनी काढले.
क्रीडा शिक्षक शंकर भास्कर पराडकर हे आचरा येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थीप्रिय परिचित होते. ३० नोव्हेंबर रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.त्यानिमित्ताने त्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे मुंबई कमिटीचे सचिव अशोक पाडावे यांच्या हस्ते आचरा हायस्कूलच्या स्कुल कमिटी चेअरमन निलिमा सावंत यांच्या उपस्थितीत शिक्षक शंकर पराडकर यांचा संस्थेच्या वतीने गणपतीची चांदीची मूर्ती शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.


यावेळी कमिटीसदस्य बाबाजी भिसळे, शंकर मिराशी, संजय पाटील मुख्याध्यापक श्री.परब, उपमुख्याध्यापक अंकुश घुटुकडे शिक्षक वर्ग कर्मचारी वर्ग, रामगड हायस्कूलचे क्रीडा शिक्षक दिनेश सावंत उपस्थित होते.
दरम्यान सत्कारला उत्तर देताना सत्कारमुर्ती पराडकर म्हणाले की, या शाळेत 21 वर्षेपेक्षा जास्त कालावधीत शिक्षक म्हणून कार्यरत होतो. संस्थेच्या माध्यमातून काम करण्याची संधी आपणास मिळाली आचरा हायस्कूलचे नाव कायम क्रिडा क्षेत्रात झळकत ठेवण्यासाठी मी प्रामाणिक काम केले. तसेच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थी घडवण्यासाठी काम केलं प्रसंगी मुलांसाठी पितृत्व मातृत्व दातृत्व अशा भूमिका बजावल्या. या संस्थेचे पदाधिकारी यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास, त्यांनी दिलेले प्रेम यासाठी मी सदैव ऋणी असून यापुढील काळात या हायस्कूलसाठी ज्या ज्यावेळी गरज असेल त्या वेळी आपण एक क्रीडा शिक्षक म्हणून साथ देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + sixteen =