You are currently viewing मालवण शहरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाची मोठ्या जोशाने सुरुवात

मालवण शहरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाची मोठ्या जोशाने सुरुवात

मालवण नगरपरिषदेचे आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सामूहिक राष्ट्रगानातुन मालवण शहरात आज क्रांतीदिनाच्या औचित्याने भारत मातेला वंदन करण्यात आले
अ. शी. दे. टोपीवाला, स. का. पाटील महाविद्यालय, भंडारी हायस्कुल, जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल या शिक्षण संस्थांच्या सुमारे 2000 शाळकरी मुलांनी शहाराच्या मध्यवर्ती ठिकाणी एकत्र येत नियोजित पद्धतीने राष्ट्रगान साजरे केले.
शहरातील महिला बचत गट, सेवा भावी संस्था, व्यापारी संघ, रिक्षा संघटना, पर्यटन महासंघ यांनी विविध भागात एकत्र येत समूह राष्ट्रगानात सहभाग दर्शविला.
मालवण मधील नागरिकही आपल्या आपल्या घरातून मालवण नगरपरिषदेने दिलेल्या नियोजित वेळी राष्ट्रगानात सहभागी झाले.
या कार्यक्रमाच्या नियोजनात मालवण नगर परिषदेस स का पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीम उज्वला सामंत, सिंधुदुर्ग कॉलेज मालवणचे असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम आर खोत, भंडारी हायस्कुल चे मुख्याध्यापक श्री खोत, अ. शी. दे. टोपीवाला हायस्कुल चे मुख्याध्यापक श्री खानोलकर, जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल चे श्री निशिकांत पराडकर व यांचे साहाय्य मिळाले.
संपूर्ण शहरातील सर्व नागरिकांना एकाच वेळी राष्ट्रगानात सहभागी होता यावे यासाठी नगरपरिषदेने मागील पाच दिवस सोशल मीडिया, वृत्तपत्रे, आमंत्रण पत्रिका यामाध्यमातून संपूर्ण शहरात जनजागृती केली होती.
नगर परिषदेकडून 10 वाजून 55 मिनिटांनी अलर्ट म्हणून पहिला भोंगा वाजविण्यात आला त्यानंतर 10 वाजून 59 मिनिटांनी दुसरा भोंगा वाजविण्यात आला व दुसरा भोंगा संपताच राष्ट्रगानास सुरुवात करावी असे निर्देश देण्यात आले होते. यासोबत नगर परिषदेच्या शहरातील विविध आठ ठिकाणी राष्ट्रगीत वाजवण्याची व्यवस्थाही केली होती.
मालवण नगर परिषदेने आयोजित केलेल्या सामूहिक राष्ट्रगानाच्या नियोजन बद्ध आयोजनामुळे मालवण शहरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाची मोठ्या जोशाने सुरुवात झालेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा