You are currently viewing वायरीत उद्या स्वामी समर्थ पुण्यतिथी उत्सव…

वायरीत उद्या स्वामी समर्थ पुण्यतिथी उत्सव…

वायरीत उद्या स्वामी समर्थ पुण्यतिथी उत्सव…

मालवण

शहरातील वायरी येथील मुणगेकर यांच्या निवासस्थानी उद्या ता. ६ मे रोजी अक्कलकोट स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. यात सकाळी ६.३० वाजता दुग्धाभिषेक, ७ ते १२ या वेळेत समर्थांचे पूजन, १२.३० ते १ या वेळेत आरती, दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजल्यापासून तीर्थप्रसाद, ५.३० ते ८ या वेळेत संगीत गायनाचा कार्यक्रम, रात्री ८ वाजता भजन असे विविध कार्यक्रम होणार आहेत. तरी या सोहळ्यात भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन चेतन मुणगेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा