You are currently viewing भाजपा अनुसूचित जाती–जमाती मोर्चाची नवीन कार्यकारणी जाहीर

भाजपा अनुसूचित जाती–जमाती मोर्चाची नवीन कार्यकारणी जाहीर

कणकवली :

 

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा पक्षाची बैठक कणकवली तालुका येथे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. कणकवली भाजपा मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे सिंधुदुर्ग अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष निवड सभा आयोजित करण्यात आली होती. सिंधुदुर्ग अनुसूचित जाती – जमाती मोर्चाची नवीन कार्यकारणी यावेळी तयार करण्यात आली.

या कार्यकारिणीत चंद्रकांत भोजू जाधव भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष, अनंत आसोलकर भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष, अंकुश विष्णू जाधव अनु.जाती. मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा सल्लागार, किरण देवेंद्र जाधव अनु.जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा संघटक सरचिटणीस, गुरुप्रसाद भगवान चव्हाण अनु.जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस, विष्णू तेंडोलकर अनु.जाती सिघुदुर्ग जिल्हा सरचिटणीस, अशोक कांबळे अनु.जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस, तर अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा सदस्य पदी चंद्रकांत वालावलकर, दशरथ गावकर, सुधाकर जाधव, कृष्णा चव्हाण, अजित तांबे, गणेश तांबे, सुदेश किनवडेकर,बाळा जाधव, विलास कुडाळकर, राजन जाधव, प्रयाग कांबळे यांची निवड करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =