You are currently viewing दिल्लीचा राजस्थानवर ४६ रन्सने दणदणीत विजय

दिल्लीचा राजस्थानवर ४६ रन्सने दणदणीत विजय

 

दुबई प्रतिनिधी/स्नेहा नाईक :

 

आयपीएल २०२० (IPL 2020) सीझनमधील २३ वी मॅच शारजाह क्रिकेट स्टेडियम वर दिल्ली कॅपिटल्स  आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाली.

सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतेही बदल केले नाहीत.

आजच्या सामन्या खच्चून आत्मविश्वास भरलेल्या दिल्ली कॅपिटल्स  कडून राजस्थान रॉयल्सच्या  गोलंदाजांची यथेच्छ धुलाई होईल, असेच वाटले होते. पण, स्टीव्हन स्मिथच्या  आक्रमक नेतृत्त्वानं दिल्लीचा धावाला लगाम लावली. पण, स्मिथवर दिल्ली चा कर्णधार श्रेयस अय्यर भारी ठरला.

राजस्थान रॉयलन्सने १९.४ ओव्हर्समध्ये १३८ रन्स करुन ऑल आऊट झाले. यामुळे दिल्ली कॅपिटल्सने ही मॅच ४६ रन्सने जिंकली आहे.

दिल्ली कॅपिल्सने या मोसमातील आपला पाचवा विजय नोंदविला आहे. राजस्थान रॉयल्सचा हा सलग चौथा पराभव आहे.मात्र दिल्लीने हा सामना ४६ धावांनी जिंकला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 5 =