You are currently viewing श्रीम. प्रियांका नाईक आणि सौ. रुपाली शिरसाट यांचे बांदा ग्रामपंचायत थेट सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

श्रीम. प्रियांका नाईक आणि सौ. रुपाली शिरसाट यांचे बांदा ग्रामपंचायत थेट सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

सावंतवाडी :

बांदा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून थेट सरपंच पद आणि सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. थेट सरपंच पदासाठी श्रीमती प्रियांका नाईक आणि सौ.रुपाली शिरसाट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ.श्वेता कोरगावकर, उपसभापती शीतल राऊळ, बांदा भाजप शहर अध्यक्ष राजा सावंत, बाबा काणेकर, सुनील राऊळ, नितेश पेडणेकर, सुनील धामापूरकर यांच्यासह उमेदवार व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपकडून प्रभाग १ मधून राजाराम उर्फ आबा धारगळकर, रेश्मा सावंत, शिल्पा परब, प्रभाग २ मधून जावेद खतीब, सौ.स्मिता पेडणेकर, सौ.श्रेया केसरकर, प्रभाग ३ मधून रत्नाकर आगलावे, गार्गी सावंत, संदीप बांदेकर, प्रशांत बांदेकर, सुधाकर बांदेकर, संदेश महाले, प्रभाग ४ मधून शामसुंदर मांजरेकर, भरत धारगळकर, सौ.पटेकर, राजाराम सावंत, निलेश सावंत, प्रभाग ५ मधून प्रियांका नाईक, रुपाली शिरसाट, उर्मिला बांदेकर, बाबा काणेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

७ तारीखला अर्ज मागे घेण्याची मुदत असून त्यानंतर भाजपतर्फे निवडणूक रिंगणात उतरणारे उमेदवार निश्चित होणार असल्याची माहिती भाजप बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × five =