You are currently viewing 1 डिसेंबरपासून सर्वसामान्यांना वापरता येईल डिजिटल रुपया

1 डिसेंबरपासून सर्वसामान्यांना वापरता येईल डिजिटल रुपया

आरबीआयची मोठी घोषणा

 

दिल्ली :

भारतीय रिझर्व्ह बँकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला डिजिटल रुपया गुरुवारी लॉन्च होणार आहे. आरबीआय ने डिजिटल या चलनासंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. आता व्यावसायिकांप्रमाणेच सर्वसामान्यांनाही डिजिटल रुपयांमध्ये व्यवहार करता येणार आहेत. 1 डिसेंबर 2022 पासून देशातील चार शहरांमध्ये डिजिटल रुपयाच्या किरकोळ वापराशी संबंधित पायलट चाचणी सुरु होत आहे. या चाचणीत सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील चार बँका SBI, ICICI, येस बँक आणि IDFC फर्स्ट सहभागी होतील. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) डिजिटल टोकनच्या स्वरूपात असेल. याला लीगल टेंडर म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सध्या ज्या मूल्यांमध्ये कागदी चलन आणि नाणी जारी केली जातात त्याच मूल्यांमध्ये डिजिटल रुपया जारी केला जाईल असे आरबीआयने सांगितले.

1 डिसेंबर 2022 पासून देशातील चार शहरांमध्ये डिजिटल रुपयाचा किरकोळ वापर सुरु होईल. या डिजिटल (E-Rupee) रुपयाचे वितरण बँकांमार्फत होईल. डिजिटल वॉलेटमध्ये हे पैसे जमा असतील. याद्वारे व्यक्ती ते व्यक्ती किंवा व्यक्ती ते व्यापारी डिजिटल व्यवहार करता येईल. E-Rupee चा वापर करण्यासाठी युजर्स मोबाईल फोन किंवा इतर उपकरणांद्वारे डिजिटल वॉलेटमधून डिजिटल रूपयाद्वारे व्यवहार करू शकतील. जर तुम्हाला दुकानदाराला डिजिटल स्वरूपात पैसे द्यायचे असल्यास तुम्हाला व्यापाऱ्याकडे असलेल्या QR कोडवर पेमेंट करता येईल.

डिजिटल रुपयाच्या किरकोळ वापरासाठीच्या पहिल्या पायलट चाचणीसाठी दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि भुवनेश्वर या शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर भविष्यात अहमदाबाद, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंदूर, कोची, लखनौ, पाटणा आणि शिमला येथे ही सेवा सुरू होईल. RBI च्या या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी 8 बँकांनी पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेचा सामावेश आहे. तर बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँकचा पुढच्या टप्प्यात समावेश होईल.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − six =