You are currently viewing ज्येष्ठ विचारवंत जयवंत मठकर यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत जयवंत मठकर यांचे निधन

गोपुरी आश्रमात शोकसभा…

कणकवली

गोपुरी आश्रमाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, महात्मा गांधी प्रस्थापित वर्धा आश्रमाचे माजी अध्यक्ष, संपूर्ण देशभरातील थोर सर्वोदयी कार्यकर्ते जयवंत मठकर यांचे काल १४ मार्च,२०२२ रोजी रात्री ८.४५ वाजता पूणे येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने गोपुरी आश्रम, महाराष्ट्रातील सर्वोदय परिवार या संस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. दिवंगत जयवंत मठकर (बापू) यांना आज मंगळवार १५ मार्च,२०२२ रोजी सायंकाळी ठीक ४.०० वाजता गोपुरी आश्रमात श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. आपण या श्रद्धांजलीसाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.राजेंद्र मुंबरकर, सचिव मंगेश नेवगे व व्यवस्थापक मंडळ,गोपुरी आश्रम यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 5 =