You are currently viewing कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँगेसतर्फे विलवडेचे आबा दळवी निरीक्षक

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँगेसतर्फे विलवडेचे आबा दळवी निरीक्षक

अ. भा काँ. कमिटीचे जनरल सेक्रेटरी केसी वेणू गोपाल यांनी केली निवड

 

सावंतवाडी :

विलवडे गावचे सुपुत्र असलेले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी रामचंद्र उर्फ आबा धर्माजी दळवी यांची कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने लोकसभा निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी केसी वेणू गोपाल यांनी ही निवड केली आहे.

याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रशासन व संघटन उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी आबा दळवी यांना कळविले आहेत. त्यानुसार आबा दळवी आपल्या कोल्हापूर दौऱ्यात काँग्रेस पक्षाचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज, महाविकास आघाडी सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष तसेच इतर वरिष्ठ नेते, पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज विजयी होण्यासाठी नियोजन करणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे आबा दळवी यांचे या राजघराण्याशी जवळचे संबंध आहेत.

 

*पक्षाचा विश्वास यापूर्वीही सार्थ*

आबा दळवी यांनी यापूर्वीही काँग्रेस पक्षाने निवडणुकीत तसेच पक्ष संघटनेत दिलेल्या अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडीत पक्षाला विजयासह उभारी मिळून दिलेली आहे. काँग्रेसचे निष्ठावंत नेते अशी आबा दळवी यांची ओळख असून त्यांचे वडील कै धर्माजी दळवी हे सुध्दा शेवटपर्यंत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होते. एक वर्षापूर्वी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर गजग मतदार संघाची जबाबदारी दिली होती. या निवडणुकीत आबा दळवी यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी चौखपणे पार पाडल्यामुळे अटीतटीच्या लढतीत काँगेसचे उमेदवार एक के पाटील यांनी भाजपच्या मातब्बर उमेदवाराचा सुमारे १५ हजार मतांनी पराभव केला. या मतदार संघात आबा दळवी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यासह आठ दिवस तळ ठोकून होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा