You are currently viewing पाट येथे आधार जेष्ठ नागरिक संघ सिंधुदुर्गया संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन

पाट येथे आधार जेष्ठ नागरिक संघ सिंधुदुर्गया संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन

वेंगुर्ले :

 

आधार जेष्ठ नागरिक संघ सिंधुदुर्ग या संस्थेच्या कार्यालयाचे उद्यघाटन पाट हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आणि पाट हायस्कूलच्या उर्जितावस्थेत मोलाचे योगदान देणारे डि.ए.सामंत सर यांच्या हस्ते विनायकाच्या म्हापणकर यांच्या घरी पाट येथे करण्यात आले.

एस.एल. देसाई विद्यालय पाट या शाळेच्या १९७६ च्या विद्यार्थ्यांनी आधार जेष्ठ नागरिक संघ सिंधुदुर्ग या संस्थेची स्थापना केली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आधार जेष्ठ नागरिक संघ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदय फणसेकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि भरीव योगदान दिल्याबद्दल पाट हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आणि संस्थेचे विश्वस्त डि.ए.सामंत सर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास आलेल्या सर्व पाहुण्यांनी सामंत सरांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याच कार्यक्रमात म्हापण पंचक्रोशीतून निवडून आलेल्या सरपंचांचा सत्कार करण्यात आला. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदय फणसेकर यांनी भविष्यात आधार जेष्ठ नागरिक संघ सिंधुदुर्ग या संस्थेमार्फत जेष्ठ नागरिकांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतील असे सांगीतले.

यावेळी सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल वेंगुर्ला या संस्थेचे अध्यक्ष इर्शाद शेख, आप्पा फणसेकर, पाटकर गुरूजी, वेंगुर्ल्याचे माजी नगरसेवक विधाता सावंत, प्रकाश डिचोलकर, नाथा मडवळ, मंदार प्रभू पाटकर, विष्णू मोर्ये, माधवी पाटकर, विनायक म्हापणकर, विलास वेंगुर्लेकर, प्रदिप मेस्त्री, नारायण पिंगळे तसेच आधार जेष्ठ नागरिक संघ सिंधुदुर्गचे सदस्य व पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 6 =