You are currently viewing १५ मार्चपासून कोकण मार्गावर धावणार होळी स्पेशल दोन गाड्या

१५ मार्चपासून कोकण मार्गावर धावणार होळी स्पेशल दोन गाड्या

सिंधुदुर्ग :

मध्य रेल्वे प्रशासनाने शिमगोत्सवासाठी जाहीर केलेल्या एलटीटी- थिविम, पुणे-थिविम साप्ताहिक होळी स्पेशल १५ मार्चपासून कोकण मार्गावर धावणार आहेत.

०११०७/०११०८ क्रमांकाची एलटीटी-थिविम साप्ताहिक स्पेशल १५, २२ व २९ मार्चला धावेल. शुक्रवारी धावणारी स्पेशल एलटीटीहून रात्री १०.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९.५० वाजता थिविम येथे पोहचेल. परतीला १७, २४, ३१ मार्चला रविवारी धावेल. थिविम येथून सकाळी ११ वा. सुटून त्याचदिवशी रात्री ११.५५ वाजता एलटीटीला पोहचेल.

ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, बिलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी स्थानकात थांबे आहेत.

०१४४५/०१४४६ क्रमांकाची पुणे-थिविम साप्ताहिक स्पेशल १५, २२, २९ मार्चला शुक्रवारी धावेल. पुणे येथून सायंकाळी ६.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता थिविम येथे पोहचेल. परतीला १७, २४, ३१ मार्चला रविवारी धावणारी स्पेशल थिविम येथून स. ९.४५ वाजता सुटून त्यादिवशी रात्री ११.५५ वाजता पुणे येथे पोहचेल.

२२ डब्यांची स्पेशल लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, आडवली, विलवडे, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी स्थानकात थांबेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा