You are currently viewing माजी खासदार सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत कणकवलीत शिंदे गट सभासद नोंदणी

माजी खासदार सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत कणकवलीत शिंदे गट सभासद नोंदणी

कणकवली :

 

कणकवली येथे शिंदे गटाच्या शिवसेनेकडून सभासद नोंदणीला आज पासून प्रारंभ करण्यात आला. यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत, माजी कृषी सभापती संदेश पटेल, सुनील पारकर, भास्कर राणे, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, दामू सावंत यांच्यासह शिंदे गट शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पत्रकार परिषदेत ब्रिगेडियर सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्यात यावा, त्या दृष्टीने पुढील धोरण ठरवले जावे. अश्या मागणीचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे, अशी माहिती पत्रकारांशी संवाद साधताना दिली. दरम्यान आपण खासदार असताना सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात निधी आणला होता. परंतु तो निधी नेमका कुठे जिरला हे समजले नाही, असा सवालही त्यांनी केला. तसेच तारकर्ली येथे तंबू निवास चालवले. जिल्ह्याच्या किनारी भागात वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनाच्या विविध योजना राबवल्या. न्याहारी निवास योजना राबवताना जिल्ह्याच्या पर्यटनात्मक विकास व्हावा यासाठी अनेक प्रयत्न केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण मुले क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून ऑलिम्पिकमध्ये पोहोचली पाहिजेत यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. शिवाय शेतीचा शाश्वत विकास झाला पाहिजे हे आमचे धोरण आहे. उत्पादित शेतीमालाला अन्य भागात बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आगामी काळात शिंदे सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकास साधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा