You are currently viewing शिकाऊ लायसन्स ऑनलाईन पध्दतीचा गैरवापर केल्यास कायम स्वरुपी लायसन्ससाठी अपात्र ठरणार

शिकाऊ लायसन्स ऑनलाईन पध्दतीचा गैरवापर केल्यास कायम स्वरुपी लायसन्ससाठी अपात्र ठरणार

सिंधुदुर्गनगरी

नागरिकांच्या सोयीसाठी तसेच कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञती चाचणी व शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑनलाईन पध्दतीने जारी करण्याची प्रणाली दिनांक 14 जून 2021 पासून सुरु करण्यात आली आहे.  वास्तविक केंद्रीय मोटार वाहन नियम 11 अन्वये शिकाऊ अनुज्ञप्तीनी अर्ज करताना उमेदवारास केंद्र शासनाने विहित केलेली परिक्षा देणे अनिवार्य आहे. या मागचा उद्देश हा की संबंधित अर्जदारास वाहतूक नियमांचे, चिन्हांचे व वाहन चालकाच्या जबाबदारी यांचे महत्व याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे जबाबदार वाहन चालक निर्माण होण्यास मदत  होते.  प्रणालीचा वापर करतेवेळी पालकांनी त्यांच्या पाल्यास  परिक्षेस महत्व पटवून द्यावे तसेच उक्त प्रणालीचा गैरवापर होणार नाही यांची जाणीव करुन देणे आवश्यक आहे.

      लोकाभिमुख सोयीसुविधांचा गैरवापर होणार नाही यासाठी प्रणालीमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात येत आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या या ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करणाऱ्या अर्जदार, संबंधित मध्यस्थ अनधिकृत व्यक्ती यांच्यावर आवश्यक ती पोलीस कारवाई करण्याच्या सूचना संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.या  प्रकरणी  दोषी ठरलेला अर्जदार हा मोटार वाहन कायदा,कलम १९ (इ) अन्वये अनुज्ञप्ती धारण करण्यास करण्यास कायमस्वरुपी अपात्र ठरेल अशी  कारवाई प्रादेशि‍क परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येईल.

         त्याचबरोबर   महा ई -सेवा केंद्र, मोटर ड्रायव्हिंग स्कूल, व इंटरनेट कॅफे   सदर सुविधेचा  गैरवापर करतील अशा संस्थांविरुध्द पोलीस कारवाई केली जाईल. या व्यतिरिक्त महा ई सेवा केंद्राबाबत जिल्हाधिकारी  मोटार ड्रायव्हिंग स्कूल बाबत संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी व इंटरनेट कॅफे विरॅध्द पोलिस  विभाग (साबर सेल) यांना आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना  दिलेल्या आहे.  असे गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्याबाबत स्थानिक प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी.  कार्यप्रणाली मध्ये नागरिकांना येणाऱ्या काही इतर अडचणीमध्ये सुधारणा करण्यात येत आहे.  असे राजेंद्र सावंत  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग यांनी कळवीले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + fifteen =