You are currently viewing माणगाव ग्रा.प सदस्य तथा माजी उपसरपंच श्रावण धुरी यांचे अकाली निधन

माणगाव ग्रा.प सदस्य तथा माजी उपसरपंच श्रावण धुरी यांचे अकाली निधन

कुडाळ :

 

माणगाव खोऱ्यातील कट्टर राणे समर्थक म्हणून ओळख असलेल्या बेनवाडी येथील रहिवासी माणगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्रावण सहदेव धुरी (वय 45) यांचे आज शुक्रवारी अल्पशा आजाराने गोवा बांबुळी मेडिकल कॉलेज येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांनी आपल्या उपसरपंच पदाच्या कारकिर्दीत ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्या पदाचा ठसा उमटविला होता. यांच्या अकाली निधनाने माणगाव खोऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या निधनाने माणगाव खोऱ्यात राजकीय पोकळी निर्माण झाली असल्याची खंत येथील राजकीय पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. उद्या शनिवारी त्यांच्यावर बेनवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा