You are currently viewing स्मृति भाग ४७

स्मृति भाग ४७

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ४७*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आज आपण *शङ्खस्मृतितील* आठवा अध्याय ” नित्यनैमित्तिकादिस्नानानाम् ” नावाचा अध्याय पाहू . मला असे वाटते की आपण या आगोदर भारताच्या सीमा वर्णित केलेला श्लोक रोज अंघोळ करतांना म्हणायला सुरवात केली असावी !! तसे खूपच सूक्त वा श्लोक म्हणावयाचे आहेत , ती यादी आज पाहूच !!!😃😃

 

*नित्यं नैमित्तिकं काम्यं क्रियाङ्गं मलकर्षणम् ।*

*क्रियास्नानं तथा षष्ठं षोढा स्नानं प्रकीर्तितम् ।*

नित्य , नैमित्तिक , काम्य , क्रियाङ्ग , मलकर्षण आणि क्रियास्नान ही सहा प्रकारची स्नाने वर्णित आहेत .

 

*१)नित्यस्नान*——

विना स्नान मनुष्य जपहोमादि क्रियांसाठी अयोग्य असतो , म्हणून जे प्रातः ( सकाळी नाही !!😃😃) स्नान करावे लागते . त्यास नित्य स्नान म्हणतात .

 

*२)नैमित्तिक स्नान*——

चण्डाल , शव , पूयादि पदार्थ , रजस्वला यांचा स्पर्श झाल्यावर वा केल्यावर स्नानास अयोग्य ही मनुष्य करत असलेल्या स्नानास नैमित्तिक स्नान म्हणतात .

 

*३)काम्यस्नान*——

ज्योतिर्विदांनी सांगितलेले , पुष्यादि नक्षत्रात केले जाणारे विधीपूर्वक विधानाचे स्नानास काम्य स्नान म्हणतात ! विना कामना असे स्नान करणे अयोग्य आहे .

 

*४)क्रियाङ्ग स्नान*——

पवित्रनामक मंत्रांनी जपाची इच्छा करणारा , देवतांची वा पितरांची अर्चना करत मनुष्य जे स्नान करतो , त्यास क्रियाङ्ग स्नान संबोधावे .

 

*५)मलापकर्षण स्नान*——

अंगावरील मळास दूर करण्यासाठी , उटणे लावून वा तेलमालिश केल्यावर जे स्नान केले जाते , त्यास मलापकर्षण स्नान म्हणतात .

 

*६)क्रिया स्नान*——

नदीत , देवताद्वारा तयार केलेल्या कुण्ड्यात , तीर्थस्थानी ( सागरे सर्व तीर्थानि म्हणून समुद्रातही !! ) केलेल्या स्नानास क्रियास्नान म्हटले जाते .

मलापकर्षण स्नान रोज केले जाणार नाही ! याचा अर्थ रोज साबू लावू नये , असाही घ्यावा का ? तसा साबूही केमीकलच ! मी ही साबू कोणताच वापरत नाही ! हा विचार नंतर पाहूच , पण साबणाने त्रास होतो , असे सांगणारे ही भरपूर आहेतच की !!

उष्णोदकाने वा परोदकाने शरीर शुद्धीच जाणली पाहीजे , पण तीर्थ स्नानाने पुण्यफळाची प्राप्ती होते , असे सांगितले आहे व सर्वतीर्थात गङ्गा विशेष गणली गेली आहे . मलापकर्षणात ही दोन प्रकार समजावे . १)शरीरमलापकर्षण व २)मनमलापकर्षण . कारण पाप करणार्‍यांचे पापशमन तीर्थस्नानादिकांनी होते व ज्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तसेच मन पूर्ण वश आहेत तसेच ज्याचेजवळ विद्या—तप व कीर्ति आहे अशीच माणसे तीर्थ स्नानाचे फल प्राप्त करतात असे ही सांगून ठेवले आहे .

पुढे क्रिया स्नानाचा पूर्ण अध्याय येतो . त्यात जल , अग्नि , वरुण व रुद्र यांची प्रार्थना करत व त्यांनी रक्षण करावे , ही याचना करत स्नान करावे . *आपोहिष्ठादि तीन ऋचा , हिरण्यवर्णादि तीन ऋचा , जगतित्यादि चार ऋचा , शं नो देवीः , शं न आपः इ. मन्त्र , अघमर्षण ऋषिंचे अनुष्टुभ छन्दोक्त अघमर्षण सूक्त इ. म्हणावे ,* असे सांगून पुढे आचमन विधी अध्याय येतो . नंतर अघमर्षण विधी अध्याय येतो . त्यात *अघमर्षण सूक्त , देवव्रत सूक्त , शुद्धवती ऋचा , कुष्माण्डी ऋचा , पावमानी ऋचा , सवितादेव ऋचा , अभीष्ट द्रुपदा स्तोम सूक्त , सप्त व्याहृति , भारुण्ड साम , गायत्री छन्द , उषना मन्त्र , पुरुषव्रत , भाषासूक्त , सोमव्रतमन्त्र , जलविषयक सूक्त , बार्हस्पत्य सूक्त , वाक्सूक्त , अमृत सूक्त , शतरुद्रीय , अथर्वशीर्ष , त्रिसुपर्ण , महाव्रत , गोसूक्त , अश्वसूक्त , इन्द्र सूक्त , दोन साम , तीन आज्यरोह , रथन्तर , अग्निव्रत , वामदेवव्रत* यांचे गान केल्याने मनुष्य पवित्र होतो व अमरत्व पावतो , हे शङ्ख ऋषिंनी सांगितले आहे .

खरंच हे पूर्वी सगळे द्विज म्हणत असावेत !! कारण जगाच्या पाठीवर कित्येक संस्कृती जन्मास आल्या व मृत झाल्या . माझी एकच संस्कृति आहे की जिचा उगम काल निश्चित नाही व जिला मृत्यु नाही !! आजचा काल लक्षात घेता संस्कृतिच्या अमरत्वासाठी ज्याला जे सूक्त येते त्याने ते रोज कृपया म्हणावे , ही विनंती या लेखाद्वारे करतो . 🙏🙏पुढे गायत्री जप वर्णन व तर्पण विधीनंतर ब्राह्मण परिक्षा वर्णन येते .

आज थांबतो . विनंती इतकीच , सर्वच स्मृति वाचनीयच आहेत . वाचाल ना ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा