You are currently viewing जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज : निलेश राणे

जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज : निलेश राणे

*हिर्लोक प्राथमिक आरोग्य केंद्राला  भाजपकडून वातानुकूलित शवपेटी प्रदान.*

कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत खूपच पिछाडीवर आहे. या यंत्रणेत विविध प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे माजी खासदार आणि भाजप प्रदेश चिटणीस निलेश राणे यांनी सांगितले. भाजप ओबीसी मोर्चा दक्षिण मुंबई यांच्यावतीने हिर्लोक प्राथमिक आरोग्य केंद्राला वातानुकूलित शवपेटी देण्यात आली. त्या प्रसंगी ते बोलत होते.

सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात डॉक्टर्सची आवश्यकता आहे. मुंबई सारख्या ठिकाणी एका रुग्णालयात पंचवीस एमडी फिजिशियन असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवघा एक  एमडी फिजिशियन असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राणे साहेब आणि भाजपच्या माध्यमातून जिल्ह्यात आरोग्य विषयक पायाभूत यंत्रणा भक्कम करण्यावर आम्ही भर दिला आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींची स्थिती सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्करुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भविष्यात कर्करुग्णांवर उपचार करणारी यंत्रणा उभारावी लागेल, असे ते म्हणाले.

यावेळी  उपस्थित जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद भाई शिरवलकर,कुडाळ तालुका अध्यक्ष दादा साईल,ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष दीपक नारकर,कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे,ओबीसी महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ.दिपलक्ष्मी पडते,जिल्हा बँक संचालक प्रकाश मौर्य,माजी सभापती मोहन सावंत,कुडाळ सभापती सौ नुतून आईर,कुडाळ नगरपंचायत नगरसेविक अभिषेक गावडे, नगरसेवक विलास कुडाळकर,सरचिटणीस देवेन सामंत,माजी सभापती राजन जाधव,हिर्लोक सोसायटीचे चेअरमन पंढरीनाथ सावंत,पंचायत समितीच्या सदस्य सुप्रिया वालावलकर, संतोष वालावलकर,बाव सरपंच नागेश परब,नागेश आईर,राकेश कांदे, माणगाव उपसरपंच दत्ता कोरगावकर, दशरथ कदम,माजी सरपंच उदय सावंत,अरविंद बाँबर्डेकर,हिर्लोक प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर चंदनशिवे,आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × five =