You are currently viewing माणगाव येथे MCL कंपनी अंतर्गत “पेड लगाओ धरती बचाओ” अभियान

माणगाव येथे MCL कंपनी अंतर्गत “पेड लगाओ धरती बचाओ” अभियान

कुडाळ :

 

कुडाळ तालुक्याील माणगाव येथे MCL कंपनी अंतर्गत “श्री एकदंत प्रोड्युसर कंपनी लिमिटेड” मार्फत “पेड लागाओ धरती बचाओ” अभियान दोन शाळांमध्ये पार पडले.

 

या अभियानाला कंपनीचे संस्थापक प्रज्ञा सत्यविजय भैरे व प्रशांत भालेराव व संचालक रुपेश (बाबी) जाधव, तसेच समुदाय कृषी व्यवस्थापक रसिका राजन राणे (उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान), कृषी सखी – शर्वरी शेखर मेस्त्री, जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा माणगाव नं १ कट्टागावच्या मुख्याध्यापिका स्नेहा गणेश घाडी, शिक्षक जियाउद्दीन अब्दुलगणी खतिब, महेश गोपिचंद लांडगे, अनघा अरूण सावंत व मुले उपस्थित होते. तर जि. प. प्राथमिक शाळा क्रमांक 3 माणगांव ढोलकरवाडीच्या मुख्याध्यापिका वनिता मोहन सावंत, शिक्षिका शैलजा चोबळेकर, अंगणवाडी सेविका लक्ष्मी केशव परब, अंगणवाडी मदतनीस स्नेहा किशोर पेडणेकर व मुले इत्यादी उपस्थित होते.

 

यावेळी या अभियानातून प्रत्येकाने किमान एक तरी झाडं घराजवळ किंवा उपलब्ध जागेत लावावे व त्याचे मनापासून संगोपन करावे, शिवाय सजीव सृष्टीचं अस्तित्व अनंत काळापर्यंत टिकवून ठेवायचे असेल, जागतिक तापमान वाढ, वातावरणातील हवेचे प्रदूषण, मातीची धुप थांबवयाची असेल तर वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाला दुसरा पर्याय नाही. झाडं माणसाचं मन, मस्तिष्क व जीवन हिरवंगार करत असतात. झाडांचं मूल्य समजून घ्या… आणि दहा रूपयाचं फक्त एक झाडं शेत असेल तर शेतात किंवा माळरानावर, डोंगरावर कुठे ही जगविण्याची जबाबदारी घ्या…या शिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही. तुम्ही गावाचे, शहराचे, देशाचे, समाजाचे आणि स्वहिताचे जर काही देणं लागत असाल तर एवढचं साध काम करा असा संदेश देण्यात आला.

मुलांना झाडे लावण्याची व संगोपन करण्याची आवड निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक जागृत करणे असा दुहेरी संदेश ही या अभियानतून देण्यात. त्याला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

 

 

 

 

या अभियानाच्या कार्यक्रमाचे नियोजन रसिका राजन राणे मॅडम यांनी केले होते. श्री एकदंत प्रोड्युसर कंपनी लिमिटेड मार्फत त्यांचे आभार मानण्यात आले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × three =