You are currently viewing भाजपा नेते निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी मोफत कुकीज आणि मॉकटेल बनवण्याचे प्रशिक्षण  

भाजपा नेते निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी मोफत कुकीज आणि मॉकटेल बनवण्याचे प्रशिक्षण  

प्रशिक्षणाचा सर्वांनी लाभ घेण्याचे विजय केनवडेकर यांचे आवाहन

मालवण

भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण शहर भाजपच्या वतीने शुक्रवारी १७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता दैवज्ञ भवन मालवणच्या सभागृहात मोफत कुकीज (वेगवेगळी बिस्किटे बनवणे) व मॉकटेल (वेगवेगळी सरबत बनवणे) प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व सराव करून घेण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्या नंतर प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पर्यटनाला आवश्यक असणाऱ्या नाविन्यपूर्ण व्यवसायाची माहिती यावेळी देण्यात येणार आहे. तरी या प्रशिक्षणाचा सर्वांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 4 =