You are currently viewing भाजपा वैद्यकीय आघाडी कडून सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचे आभार!

भाजपा वैद्यकीय आघाडी कडून सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचे आभार!

 

प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रजित नायर यांच्या नेतृत्वात लाभार्थ्यांना कार्ड वाटपाची मोहीम हाती घेतली आहे हे कौतुकास्पद आहे. खरंतर महाराष्ट्रात सद्यस्थितीत लागू असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने इतकीच आयुष्यमान भारत ही योजना समाजातील शेवटच्या घटकाला आरोग्याच्या समस्यांवर न्याय देणारी आहे. अनेक दुर्धर आजारांवरचे उपचार, महागड्या शस्त्रक्रिया या योजनेअंतर्गत सहजपणे होऊ शकतात ज्याचा लाभ समाजातील शेतकरी, कष्टकरी, मजूर घेऊ शकतो. काल लाभार्थ्यांना झालेल्या कार्ड वाटपामुळे निश्चितच अनेक गरजवंताना जिवदान मिळण्यास मदत होईल असे मत भाजपा वैद्यकीय आघाडीच्या वतीने डॉ अमेय देसाई यांनी व्यक्त केले. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे अभिप्रेत असलेल्या या योजनेच्या सुलभ अंमलबजावणी करिता भाजपा चे सदस्य नेहमीच प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी कटीबद्ध असतील असेही ते म्हणाले. त्याचाच एक भाग म्हणून उर्वरित ६५,०४० लाभार्थ्यी ज्यांचे अद्याप कार्ड तयार झालेले नाही अशांची गावनिहाय तपशीलवार यादी सुद्धा मे २०२२ मध्ये प्रधानमंत्री कार्यालयाच्या पोर्टलवरुन संकलित केलेली होती. संबंधित विषयावर जिल्ह्याच्या कार्यक्षम जिल्हाधिकारी श्रीम. के. मंजूलक्ष्मी तसेच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे यांच्यासोबत प्राथमिक चर्चा सुद्धा झालेली होती. प्रशासनाने आता ७६७२२ लाभार्थ्यांना कार्ड वाटप करणे सुरु केल्यामुळे आता ती गावनिहाय यादी सुद्धा जिल्हा प्रशासनाला सुपूर्द करुन उर्वरित ६५,०४० लाभार्थ्यांना कार्ड वाटप जलदगतीने होईल आणि सिंधुदुर्ग जिल्हा आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना १००% कार्ड वाटपाच्या बाबत देशातील दूसरा जिल्हा होईल हे ध्येय सिद्ध करण्यासाठी भाजपा चा प्रत्येक सदस्य कटीबद्ध असेल असेही डॉ देसाई म्हणाले. सद्यस्थितीत जम्मू कश्मीर मधील सांबा जिल्हा हा देशातील पहिला जिल्हा आहे ज्यात ह्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना १००% कार्ड वाटप झालेले आहे अशी माहिती डॉ देसाई यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 5 =