You are currently viewing तब्बल 24 वर्षांनी वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालयात पुन्हा भरली शाळा

तब्बल 24 वर्षांनी वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालयात पुन्हा भरली शाळा

*तब्बल 24 वर्षांनी वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालयात पुन्हा भरली शाळा*

*वामनराव महाडिक हायस्कूल मध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा*

*वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालयात सन 1999-2000 ची एस.एस.सी.बॅच पुन्हा एकत्र*

माजी विद्यार्थी हे प्रशालेच्या प्रगतीचे आधारस्तंभ आहेत, त्यांच्या यशामुळे प्रशालेचे नाव उज्वल होते.आपण कितीही उंच उंच झेप घेतली तरीही आपल्याला घरट्यात यावच लागतं,त्याप्रमाणे यशाची उंच शिखरे ज्या संस्कारक्षम शाळेमुळे आपण गाठतो त्या प्रशालेला कधीच विसरता कामा नये हे आपले आद्य कर्तव्य आहे,असे प्रतिपादन वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,तळेरेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी केले.
ते सन 1999-2000 च्या दहावी बॅचच्या स्नेह मेळाव्यात बोलत होते.
शाळेची घंटा वाजली की राष्ट्रगीत आणि प्रार्थनेचा आनंद पुन्हा एकदा अनुभवला तो 1999-2000 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी.प्रशालेत तब्बल 24 वर्षांनी पुन्हा शाळेत विद्यार्थी म्हणून येण्याचा आनंद त्यांनी घेतला,यावेळी त्या शैक्षणिक वर्षातील अमोल कल्याणकर,शैलेश सुर्वे,निलेश महाडिक,रोहित महाडिक,स्वप्निल वनकर,संदीप कोळेकर,सचिन ताम्हणकर,सचिन ईस्वलकर, समीर कुडतरकर,नंदकुमार देसाई, संजय बारस्कर,जयशंकर ढेकणे,भक्ती साळवी,संगीता खटावकर,संगीता भांबुरे, ज्योत्स्ना मांगले,स्वाती आलव, नम्रता डंबे,वृषाली धुरी,सुरेखा शेट्टी,शुभांगी कल्याणकर,सीमा तळेकर,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्रथमतः स्नेह मेळाव्याची सुरुवात राष्ट्रगीताने व दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली.प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या कार्याची थोडक्यात ओळख व मनोगते व्यक्त केली.
शाळा या एका शब्दापाशी खरंतर एक अनामिक ओढ आहे. जिव्हाळा,आपुलकी,आदर आहे. आपलं अख्खं विश्वच या एका ठिकाणी सामावलेलं असतं.आणि म्हणूनच शाळा आपल्याला पुढील आयुष्यात या खुल्या जगात खंबीरपणे नेतृत्व करण्याची, सुखी क्षणांचा आनंद घेण्याची, प्रामाणिकपणे जगण्याची, आत्मविश्वासाने समाजात वावरण्याची,ताकद देते.येथील शिक्षकांमुळे आम्ही चांगले घडलो आणि आमची पुढची पिढीसुद्धा येथे घडत आहे,याचा मला अभिमान वाटतो असे मत संदिप कोळेकर यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रशालेच्या सहा.शिक्षिका डी.सी. तळेकर,एस.एस.पडवळ,पी.एन.
काणेकर यांनीही याप्रसंगी आपली मनोगते व्यक्त केली.
माजी विद्यार्थ्यांनी दहा हजार रुपयांचेआर्थिक सहाय्य विद्यालयाला भेट म्हणून प्राचार्यांकडे सुपूर्द केले.त्यातून प्रशालेच्या परिसरात आठवण म्हणून झाडे लावण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली……

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा