You are currently viewing समाजातील,असहाय्य दिनदुबळ्यांच्या अंधकारमय आयुष्यात ,सहकार्याचा प्रकाश देणार्या निस्वार्थी समाजसेवकांचै कार्यगौरव पुस्तक म्हणजे..

समाजातील,असहाय्य दिनदुबळ्यांच्या अंधकारमय आयुष्यात ,सहकार्याचा प्रकाश देणार्या निस्वार्थी समाजसेवकांचै कार्यगौरव पुस्तक म्हणजे..

*समाजातील,असहाय्य दिनदुबळ्यांच्या अंधकारमय आयुष्यात ,सहकार्याचा प्रकाश देणार्या निस्वार्थी समाजसेवकांचै कार्यगौरव पुस्तक म्हणजे….*

*”काळोखातील दिवे”…..*

काळोख म्हटलं की आपल्या सभोवती भिती, दडपण, उदासीनतेचं नकारात्मकतेचं गूढ गडद वलय निर्माण झालं आहे अन् त्या वलयात आपन गुदमरून जात आहे असं वाटून जातंं..

खरंतर आपण सर्व अविनाशी, प्रकाशमय स्वरुप असलेले जीव आहोत पण आपल्या अवास्तव हट्टामुळे तसंच आपल्याला मिळालेल्या अंशिक स्वातंत्र्यामुळे अनादी, अनंत,अवकाशाच्या काळोखाच्या पोकळीतील ब्रम्हांडात ८४ लक्ष योनीतील देह धारण करुन सुखोपभोग घेण्यासाठी जन्माला आलो. ह्या काळोख्या जगात आपण आत्म्याच्या दिव्य प्रकाशाने आपल्या नश्वर दु:खमय देहाच्या अस्तित्वासाठी धडपडू लागलो. पण सारं व्यर्थ‌. इथंही दुःखाने आपली पाठ सोडलीच नाही.. परिणामी, हताश होवून आपण मानव सकारात्मकतेचं दिव्यतेज हरवून काळोख्या दुनियेत अधिकाधिक दुःखी होऊ लागलो…

खरंतर इथलं अस्तित्व नश्वर आहे हे पुर्णपणे विसरुन गेलो. संपुर्ण आयुष्यभर तहानलेल्या हरणासारखं खोट्या नश्वर सुखाच्या मृगजळाच्या पाठीमागे धावंत सुटलो अन् अधिकाधिक दुःखी होऊ लागलो. ह्यातून बाहेर पडण्यासाठी हात पसरु लागलो..
खरंतर वाळवंटात पाणी कसं मिळेल? नशिबात जे मिळालं ते स्वीकारावं लागेल..तरीही आपण नशिबाला दोष देतो, हे अगदी चुकीचं आहे. पण विसरभोळ्या स्वार्थी मानवी स्वभावाला औषध नाही.. एक मात्रं खरं की, माणसाचा हा खोटा भ्रम दूर करण्यासाठी आणि नकारात्मकतेचा काळोख दूर करण्यासाठी काही दैवी तेजाची माणसं, “काळोखातील दिवे” बनून, सकारात्मकतेच्या दिव्य तेजाने हरवलेल्या आपल्या मानवबांधवांच्या जीवनांत प्रेम, आपुलकी अन्, सहकार्यभावनेतून त्यांचं जीवन उजळून टाकण्याचं काम करीत आहेत..

आयुष्य जगताना डोळसपणे जगायला पाहिजे. आपल्या आजुबाजूला काय घडतं? जर कुणी दुःखी कष्टी असेल तर त्यांच्या सुखदुःखांत सहभागी व्हायला पाहिजे, हे लक्षात घेऊन मी शक्य तेवढं उपयोगी पडण्यासाठी प्रयत्न करीत होतो. अन् अशा वेळी दिनदुबळ्यांच्या काळोख्या आयुष्यात काही समाजसेवी माणसं दिव्यासारखा उजेड देताना पाहीली.. अन् अशा काळोखातील दिव्यांची समाजाला ओळख व्हावी आणि त्या़ंच्या निस्वार्थ सेवाकार्याने इतरांनाही लाभ होऊन प्रेरणा मिळाली पाहिजे ह्यासाठी *”काळोखातील दिवे”* ह्या पुस्तकाची कोनशिला रचली गेली.‌ काळोख्या वाटेने जाताना हळुहळू एकेक तेजाचा दिवा नजरेसमोर येऊ लागला. त्याच्या प्रकाशाने न्हाऊन निघालो…
मान्यवर रसिक वाचकहो, “काळोखातील दिवे” हे पुस्तक एकूण १३ दिव्यांच्या समाजसेवी कार्याच्या तेजोमय प्रकाशाने न्हाऊन निघाले आहे.. त्यांचं हे तेजोमय कार्य आपल्याला नक्कीच प्रेरणादायी ठरेल. आपण हे पुस्तक वाचून समाजसेवी कार्यासाठी प्रोत्साहीत व्हालं ह्याची मला खात्री आहे.. आपणही समाजसेवी कार्याला हातभार लावून दिव्याने एक नवा दिवा पेटवुया. समाजातील निराधारांचे काळोखे आयुष्य तेजोमय प्रकाशाने लखलखीत करुया…..

शब्दांकन, लेखक- जगन्नाथ चां. खराटे-
यशोधन नगर – ठाणे, संपर्क..८६५२६२९०६८

टिप–
(पुस्तक खरेदीसाठी संपर्क..
किताबरायटीगं पब्लिकेशन्स,
दिव्या त्रिवेदी..
संपर्क क्रमांक..7506994878)…

 

*संवाद मिडिया*

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031

*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − four =