You are currently viewing शुभांगी पासेबंद आणि रुपेश पवार यांचे संयुक्त विद्यमाने पसायदान व्याख्यान ठाण्यात संपन्न

शुभांगी पासेबंद आणि रुपेश पवार यांचे संयुक्त विद्यमाने पसायदान व्याख्यान ठाण्यात संपन्न

ठाणे :

 

ठाण्यातील साहित्यिका सौ शुभांगी पासेबंद आणि साहित्यिक पत्रकार अॅड श्री रुपेश पवार यांनी संयुक्तरित्या “सोपे पसायदान” या विषयावर व्याख्यान संपन्न केले. कार्यक्रमाची सुरुवात मधुकर घोडविंदेनी केली. यावेळी त्यांनी जय शारदे ही प्रार्थना गाऊन सादर केली. पसायदानाचे गायन झाले. यावेळी व्याख्यात्या शुभांगी पासेबंद यांनी यथार्थ पसायदानाचा अर्थबोध उपस्थित भक्त ,श्रोत्यांना करून दिला. सर्व भक्त तल्लीन होऊन तो अर्थबोध ग्रहण करत होते. त्यातून हे व्याख्यान खूपच आकर्षक झाले. पसायदानाच्या अर्थातून माणसाने जीवन कसे जगावे हे सांगितले गेले. पसायदानाच्या नऊ ओव्यांना ,दोन दोन ओळीतून रुपेश पवार यांनी काव्यात्मक कथन केले. हे काव्य कथन उपस्थित भक्त श्रोत्यांना मनापासून आवडले. कार्यक्रमाच्या शेवटी रुपेश पवार तथा शुभांगी पासेबंद यांनी मंडळाच्या सर्व सदस्यांचे आभार मानले. यावेळी रुपेश पवार यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कार्यावर आपले विचार थोडक्यात मांडले. ते म्हणाले, त्यावेळच्या समाजाने संत ज्ञानेश्वर माऊलींवर अन्याय केला, तरीही सर्वांसाठी माऊलींनी ईश्वराकडे पसायदान मागितले. म्हणजे संत ज्ञानेश्वर वैश्विक माणूस म्हणून जगले आणि इतरांना जागवले. आज साडेसातशे वर्षे झाली, तरी माऊलींना आपण विसरलो नाही. असे रुपेश पवार यांनी बोलताना सांगितले.

 

हा व्याख्यानाचा कार्यक्रम श्री ज्ञानदेव सेवा मंडळाच्या वतीने श्री निवृत्तीनाथ सभागृह श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिर , पाचपाखाडी ठाणे येथे झाला. यावेळी मंडळाच्या सदस्य उपस्थित होते. अतिशय उत्साही वातावरणात हा कार्यक्रम झाला. लोकराजा न्यूज चॅनेल ने या कार्यक्रमाला प्रसारित करण्याकरता आपले कार्यात्मक योगदान दिले. शुभांगी पासेबंद यांनी अतिशय सुंदर, प्रासादिक रित्या पसायदानाचे विवेचनाचा कृपाप्रसाद श्रोत्यांना दिला. हे त्यांचे निरपेक्ष कार्य माऊली पर्यंत पोहोचले. असेच म्हणावे लागेल.

 

अॅड श्री रुपेश पवार

9930852165

प्रतिक्रिया व्यक्त करा