You are currently viewing म्हापण येथील उबाठाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मंत्री केसरकरांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल

म्हापण येथील उबाठाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मंत्री केसरकरांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल

वेंगुर्ला :

 

महायुतीचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ म्हापण जिल्हा परिषद मतदार संघात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कॉर्नर बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी मंत्री दीपक केसरलर यांच्या उपस्थितीत तसेच उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, भोगवे माजी सरपंच महेश सामंत, कोचरे सरपंच योगेश तेली यांच्या प्रयत्नातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला.

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कॉर्नर सभा किल्ले निवती, परुळे- कुशेवाडा, श्रीरामवाडी मेढा- निवती, कोचरे, म्हापण याठिकाणी गुरुवारी संपन्न झाल्या. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, सावंतवाडी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, भोगवे माजी सरपंच महेश सामंत, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक रूपेश पावसकर, सुनिल डुबळे, उपजिल्हाप्रमुख सुनिल मोरजकर, भोगवे सरपंच सौ.वायंगणकर, पं स माजी सदस्य प्रणाली बंगे, विभाग प्रमुख देवदत्त साळगांवकर, कोचरे सरपंच योगेश तेली, भोगवे माजी सरपंच रूपेश मुंड्ये, सोसायटी माजी चेअरमन विष्णू माधव, चेतन सामंत आदी उपस्थित होते.

यावेळी उबाठा शिवसेनेचे श्रीरामवाडी शाखाप्रमुख विनायक खवणेकर, हेमंत निवतकर, संभाजी सारंग, हर्षल निवतकर यांनी प्रतिनिधीक स्वरूपात शिवसेनेत प्रवेश केला. तसेच परुळे माजी उपसरपंच मनिषा नेवाळकर आणि उमेश नेवाळकर, परूळे सोसायटी माजी चेअरमन विष्णू माधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच मेढा आडवेळ येथील शंकर रावले, गजानन रावले, विजय रावले, राजन रावले, संजय रावले, दिलीप कोचरेकर, महेश रावले, कुणाल रावले, कविता रावले धीरज कोचरेकर यांनी तर मेढा विष्णू मंदिर येथील मुरारी सारंग, लक्ष्मण भगत, सातू पडते, उल्हास नाईक, परशुराम भगत, रमेश भगत, उमेश भगत, कृष्णा भगत, सुरेश पडते, दशरथ पडते, चिलीयाबाळ तांडेल, विठोबा पराडकर, राजन खवणेकर, भगवान भगत, गुरुनाथ पडते, उत्तम पडते, राकेश सारंग, अरविंद मेतर, विक्रम खवणेकर आदी कार्यकर्त्यांनी मंत्री केसरकर यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा