त्या मग्रूर रुग्णावाहीका मालकाला पाठीशी घालण्याचा प्रकार चालु असुन त्याला अद्दल घडविल्या शिवाय मनसे स्वस्थ बसणार नाही.

त्या मग्रूर रुग्णावाहीका मालकाला पाठीशी घालण्याचा प्रकार चालु असुन त्याला अद्दल घडविल्या शिवाय मनसे स्वस्थ बसणार नाही.

दया मेस्त्री – मनसे सिंधुदुर्ग उपजिल्हाध्यक्ष

कोरोना रुग्णाच्या नातेवाईक महिलेशी असभ्य वर्तन करून अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या, अवाजावी भाडे आकारून जनतेला लुटणाऱ्या रुग्णवाहिका मालकाला अद्याप अटक नाही. कोरोना रुग्णवाहिका मालकाने भाड्यावरून अर्वाच्य भाषेत एका महिलेशी वाद घातलेली क्लिप सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरलं झाली. एका महिलेशी अरेरावी करीत उचलण्याची धमकी देणाऱ्या या नराधमा विरोधात सर्वस्तरावर नाराजी निर्माण झाली होती.

हा इसम कोरोना काळात कित्येक दिवस अशाप्रकारे दादागिरी करून इतर रुग्णवाहिका मालकांना त्रास देण्याचा प्रकार करीत होता. कोणतंही तारतम्य न बाळगता बेसुमार भाडे आकारून कोरोना काळात जनतेची लुबाडणूक या नराधमांने केलेली आहे.
माझं कुणी काही वाकडं करू शकत नाही. पोलीस, RTO, माझ्या खिशात आहेत. हे या इसामाचं बोलणं खरं आहे की काय..?असे जिल्ह्यातील जनतेला वाटु लागले आहे.. सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांना दया मेस्त्री यांनी निवेदन दिलेले आहे. मात्र त्यांच्या कडुन देखील कारवाई झाली नाहीच तर राज्य पोलीस महानिरीक्षक यांच्या कडे दाद मागुन कारवाई करण्यास भाग पाडू असा इशारा दया मेस्त्री – मनसे सिंधुदुर्ग उपजिल्हाध्यक्ष यांनी निवेदनाद्वारे दिला आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा