You are currently viewing आ.वैभव नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात मांडला वृद्ध कलाकार पेंशन प्रश्न

आ.वैभव नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात मांडला वृद्ध कलाकार पेंशन प्रश्न

अपेक्षित कार्यवाही करण्याची ना.अमित देशमुख यांची ग्वाही

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वृद्ध दशावतारी कलाकार, भजनी कलाकार यांची संख्या मोठी आहे. जिल्हास्तरावर वृद्ध कलाकारांच्या पेंशन संदर्भात बैठक होते. त्यात हजारो प्रस्ताव दाखल झालेले असतात त्यातील केवळ १०० प्रस्तावांना मान्यता दिली जाते. त्यामुळे अनेक पात्र कलाकार या योजनेपासून वंचित राहत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक वेगळी योजना आखून मान्यता दिल्या जाणाऱ्या प्रस्तावांची संख्या वाढवावी ज्यामुळे जास्तीत जास्त वृद्ध दशावतारी ,भजनी कलाकारांना पेंशन योजनेचा लाभ मिळेल. त्याबाबतची कार्यवाही केली जाईल का? अशा प्रश्न आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला.
त्याचबरोबर कोरोना काळासाठी कलाकारांना अनुदानाची योजना डिसेंबर मध्ये जाहीर करण्यात आली मात्र अधिकाऱ्यांच्या दिरंगाई मुळे मार्च महिना आला तरी एकाही कलाकाराला अनुदान मिळाले नाही. दशावतारी मंडळे यांना देखील अनुदान जाहीर केले मात्र ते देखील मिळाले नाही. याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? याबाबत आमदार वैभव नाईक यांनी विचारणा केली त्यावर सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी या योजनेत सुधारणा करण्यात येणार असून आ. वैभव नाईक यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा अंतर्भाव योजनेत केला जाईल अशी ग्वाही दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + fourteen =