You are currently viewing प्रिय दुःख

प्रिय दुःख

*काव्यनिनाद साहित्य मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री गायिका सौ.कविता वालावलकर लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*प्रिय दुःख*

थोड थोड रोज मरणे
थेंब थेंब अश्रू गाळणे
असह्य होत आता सार
किती वेळ हे छळणे

काही जखमा अबोल
काहीचा उगा बोभाटा
कुणास त्याची पर्वा
कुणाचा जीव उफराटा

कधी जिव्हारी शब्दांचा
सलत जातो तो काटा
आयुष्यात वादळाच्या
हरवून गेल्या सर्व वाटा

शोधते किनारा मी रे
भांबावतो जीव एकटा
हेलकावूनी फेकती मज
मनी बेभान ह्या लाटा

आयुष्य लागले पणास
तरी लढा नाही थांबला
ठणकावते रोज मनास
उगवेल उद्या दिवस चांगला

सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 17 =