You are currently viewing जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनींची दमदार कामगिरी!

जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनींची दमदार कामगिरी!

जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनींची दमदार कामगिरी!

सावंतवाडी

शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने क्रीडा संकुल, ओरोस येथे आयोजित करण्यात आलेल्या १४ वर्षांखालील वयोगटाच्या जिल्हास्तरीय शालेय ॲथलेटिक्स स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, कोलगावच्या दोन गुणवंत विद्यार्थिनींनी नेत्रदीपक कामगिरी करत प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. सावंतवाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना प्रशालेतील इयत्ता सहावीतील कु. अनिका मिथिलेश सुकी आणि इयत्ता ७ वी मधील कु. अस्मि धीरज सावंत यांनी आपल्या उत्कृष्ट क्रीडाकौशल्याच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत कु. अनिका सुकी हिने गोळाफेक प्रकारात ७.२३ मीटर अंतरावर गोळा फेकून प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकाची प्राप्त केले. तर कु. अस्मि धीरज सावंत हिने थाळीफेक प्रकारात १७.६५ मीटर अंतरावर थाळी फेकून द्वितीय क्रमांक मिळवला आणि रौप्यपदक पटकावले. दोन्ही विद्यार्थिनींनी आपल्या दमदार कामगिरीने प्रशालेचा नावलौकिक उंचावला.
या यशाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही खेळाडूंची डेरवण येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय शालेय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हास्तरावर यश संपादन करून विभागीय स्पर्धेत प्रवेश मिळवणाऱ्या या दोन्ही विद्यार्थिनींच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या यशामागे विद्यार्थिनींची मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण सराव यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांना प्रशालेचे क्रीडा प्रशिक्षक श्री. शैलेश नाईक सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशालेचे अध्यक्ष माननीय ॲड. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा