You are currently viewing राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे मुख्य नेते आज पिंगुळी पाझर तलाव उपोषणकर्त्यांची भेट घेणार.

राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे मुख्य नेते आज पिंगुळी पाझर तलाव उपोषणकर्त्यांची भेट घेणार.

राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे मुख्य नेते आज पिंगुळी पाझर तलाव उपोषणकर्त्यांची भेट घेणार.

कुडाळ

पिंगुळी वासियांच्या पिण्याच्या पानाचे मुख्य स्त्रोत पिंगुळी पाझर तलाव ज्यावर परप्रांतीय बिल्डरने अतिक्रमण करून तलावाचे अस्तित्व धोक्यात आणले आहे. याची गंभीर दखल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली त्यांनी पक्षाचे मुख्य शिलेदार
मनसे नेते तथा माजी आमदार बाळा नांदगावकर, नेते महाराष्ट्र राज्य शिरीष सावंत व राज्य सरचिटणीस संदीप दळवी यांना जिल्ह्यातील पूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश दिल्यानंतर पिंगुळी ग्रामस्थ तसेच उपोषणकर्ते जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांची आज भेट घेणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात परप्रांतीय बिल्डरांकडून अमाप पैशाच्या जोरावर सर्व शासकीय अधिकारी व सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी यातला आपल्या दावणीला बांधून स्थानिक जनतेला होणाऱ्या त्रासाची दखल मनसेने घेतली असेल यापुढे प्रत्येक जिल्हावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आक्रमकपणे परप्रांतीयांची दादागिरी मनसे स्टाईल मोडून काढणार आहे. त्यानुसार आज पक्षाचे प्रमुख नेतेमंडळी परप्रांतीयांच्या त्रासाने बाधित पिंगुळी ग्रामस्थ व दोडामार्ग तालुक्यातील सासोली ग्रामस्थ यांची आज भेट घेणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा