You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस नेते रतनभाऊ कदम यांची पक्षावर नाराजी

राष्ट्रवादी काँग्रेस नेते रतनभाऊ कदम यांची पक्षावर नाराजी

सिंधुदुर्ग :

 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर रतनभाऊ कदम यांनी आपली नाराजी व्यक्त केली. पक्षाचे खासदार मा.ना.सुप्रिया ताई सुळे यांचे मुंबईमधील पक्षाचे काम सांभाळणारे त्यांचे P.A. सुरेश पाटील यांच्या वागणुकीमुळे रतनभाऊ कदम राष्ट्रवादी पक्षावर नाराज झाले आहेत.

या संदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.शरद पवार साहेब यांची भेट घेऊन अनेक विषयांवर चर्चा करणार आहेत. साहेबांशी चर्चा करुन मार्ग न निघाल्यास व भेट न झाल्यास आमच्या आमच्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या विचाराने पुढे सिंधुदुर्ग,रत्नागिरी, मुंबई ,नाशिक व अनेक जिल्ह्यांमध्ये पत्रकार परिषद घेऊन मोठा निर्णय घेण्यात येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा