You are currently viewing मी रिमझिम पाऊस व कांदाभजी

मी रिमझिम पाऊस व कांदाभजी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*मी रिमझिम पाऊस व कांदाभजी*

 

पाऊस म्हणजे आठवणींचा साठा, मस्तीची उधळण आणि खवय्यांचा एक सणच …

धो-धो कोसळणारा पाऊस..

अशावेळी गरमागरम भजी आणि मस्तपैकी चहा असा मेनू म्हणजे पावसाळ्यात गरमागरम अनुभव देणारा क्षण..

रखरखीत उन्हाळ्यानंतर येणाऱ्या पावसाचे मला नेहमीच कौतुक वाटते…

माझी नी पावसाची वेगळीच गट्टी आहे… पाऊस येणार म्हणजे निसर्गासोबतच आयुष्यही नव्याने बहरणार असं मला नेहमीच वाटतं…

हिरवागार, तजेलदार निसर्ग आणि पाऊस जसा माझा लाडका तसा तो सगळ्यांचाच लाडका पण त्याचा आनंद घेण्याची कल्पना मात्र प्रत्येकाची निरनिराळी असते.. पक्षू-पक्षी मुक्तपणे पाऊस अंगावर झेलतात तर मोर आपला पिसारा फुलवून नाचतो.. लहान मुले पावसात भिजण्याचा व पावसाची गाणी म्हणण्याचा आणि कागदाच्या होड्या करून त्या पाण्यात सोडायचा आनंद लुटतता..लुटत असतात…

पावसाचा आवाज आणि ढगांचा गडगडाट ऐकू आला की बऱ्याचदा मी संगीत ऐकता ऐकता पाऊस बघायला हातात चहाचा कप घेऊन गॅलरीत जाते तर कधी पुस्तकात रमते, तर कधी मित्रमंडळींसमवेत गप्पांमध्ये रंगते किंवा संगीताच्या साथीत रमते तर कधी माझ्या गिटारवरच्या तारेवरही सुर छेडते..

पावसात फुटबॉल खेळायला ही खूप आवडते..(आताशा खेळत नाही)

पाऊस आल्यावर कविता तर सुचतेच व माझ्या मनातली कवियत्री जागी होते..

पाऊस म्हणजे धुंद वातावरण

सोबतीला असते नकळत

कोणाची तरी आठवण..!!

अंगावर पाऊस झेलत गरमा गरम भजी खात गप्पांचा फड रंगतो तेव्हाचा पावसाचा आनंद काही औरच… !!

पाऊस आणि भजी यांचं काही अतूट असं नातं असावं.. पाऊस म्हटला की आठवतात भजीच भजी..

बाहेर मुसळधार पाऊस, वाफाळता चहा आणि सोबत गरमागरम भजी आहाहा…!! नुसते ऐकूनच तोंडाला पाणी सुटते नाही….अश्या या थंडगार वातावरणात गरमागरम चहा आणि चवदार कांदाभजी … आता बघा ना भिज.. जिभ..भजी.. नी वाफाळलेला चहा काय अप्रतिम योग आहे ना हा.!

भजी हा जसा माझा अतिशय आवडता पदार्थ आहे तसा सर्वांचाच अतिशय आवडता आहे. पावसाळ्यात भजी खाण्याची मजा काही वेगळीच असते नाही…!पावसाचा आनंद त्याच्यासोबत गरमागरम चहा, खमंग भजी, कोळशाच्या शेगडीवर खरपूस भाजलेले मक्याचे कणीस आणि चविष्ट वडापाव असे पदार्थ असतील

तर क्या बात है… मग बघायलाच नको…

मात्र अशावेळी गरम भजी खाण्याची तल्लफ मात्र सगळ्यांनाच येते आणि त्या पावसाळी वातावरणात भज्यांचा आस्वाद घेत गप्पा आणि आठवणी जास्तच रंगतात..

प्रत्येकाचे पावसाची मजा लुटण्याचे मार्ग अगदीच वेगवेगळे असतात… लाँग ड्राईव्हला जाणे, मोटरसायकल, स्कूटरवरून भिजत फिरायला जाणे, डोंगरदऱ्‍यांतून भटकणे, ट्रेकला जाणे आणि रस्त्यात थांबून टपरीवर चहा आणि भज्यांचा आस्वाद घेणे यामध्ये मनापासून रमतात. काहीजण निसर्गरम्य ठिकाणी जातात तर काहीजण डोंगरावरून पडणारे धबधबे आणि दुथडी भरून वाहणाऱ्‍या नद्या बघायला जातात..

मला लाॅगड्राईव्हला जायला खूप आवडते आणि मी जातेही..

पावसाची मजा म्हणजे कविता आणि छत्री विसरून पावसात भिजणं… त्यानंतर टपरीवरचा गरमागरम चहा आणि कांदाभजी.. दोस्तांच्या छान रंगलेल्या गप्पा… हा म्हणजे माझा पावसाळ्यातला आनंद…

पाऊस किती आनंदाचे क्षण घेऊन येतो…

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी— ठाणे@

9870451020

 

 

*संवाद मिडिया*

 

*गुरुजनांसाठी हिरो ची खास ऑफर..*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

💥 *शिक्षकदिन विशेष ऑफर* 💥

 

खास आपल्या गुरुजनांसाठी हिरो वाहन खरेदीवर खास सवलत 😇😇

 

HF DLX/SPLENDOR/PASSION सिरीझ वर रुपये 2000/-

 

SUPER SPLENDOR/GLAMOUR सिरीझ वर रुपये 2500/-

 

SCOOTER/PREMIUM सिरीझ वर रुपये 3000/-

 

दिनांक 20/09/2023 पर्यंत 🗓️

 

आजच बुक करा..📝

 

🎴मुलराज हिरो, एम.आय.डी.सी. कुडाळ

 

📱9289922336 / 7666212339

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा