You are currently viewing कांदेनवमी

कांदेनवमी

कांदेनवमी

आज कांदेनवमी आहे
भजी खायची चेपून
चार महिने खाणार नाही
थाप द्यायची ठोकून ॥

तसंही हल्ली विधिनिषेध
कोण कुठला पाळतंय
रोज संध्याकाळी नित्यनेमाने
कोण धूप जाळतंय ?

पूर्वजांनी नियम आखले
त्याला नक्कीच शास्त्राधार
बुरसट विचार म्हणत आपण
घेतो कुठे मनावर फार ??

दिवस, वार, ऋतू, वेळ
काहीच आपण बघत नाही
चाट आयटम्स खाल्याशिवाय
दिवस आपला निघत नाही ॥

थोडेफार नितीनियम
पाळले तरच होऊ शकतं
तब्बेतीच्या तक्रारींना
दूर ठेवणं जमू शकतं ॥

आपलं म्हणजे असं आहे
कळतं सगळं वळत नाही
जिव्हालौल्य चौखूर आपलं
कितीही जाळा जळत नाही ॥

यंदा नाही पुढच्या वर्षी
म्हणतं मन सगळं पाळू
आणखी एकच प्लेट खाऊन
जठराननाला चला जाळू ॥

*AK (काव्यानंद) मराठे*
कुर्धे, पावस, रत्नागिरी
9405751698
*संग्रह अजित नाडकर्णी,शुभांजीत श्रृष्टी*

प्रतिक्रिया व्यक्त करा