You are currently viewing डॉ. तानाजीराव चोरगे महाविद्यालयाचा पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न

डॉ. तानाजीराव चोरगे महाविद्यालयाचा पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न

*डॉ. तानाजीराव चोरगे महाविद्यालयाचा पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न*

*(मांडकी-पालवण, ता. चिपळूण)*:

कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित, मुंबई विद्यापीठ संलग्न डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय तसेच डॉ. तानाजीराव चोरगे अध्यापक महाविद्यालय, मांडकी-पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने पदवीदान सोहळा रविवार, दि. ३१ मे २०२६ रोजी संस्थेच्या बहुउद्देशीय सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे होते. प्रमुख उपस्थितीत संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, संस्थेच्या संचालिका व वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अंजलीताई चोरगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सचिन तांबेकर तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. नारायण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पदवीदान मिरवणुकीने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन, वंदे मातरम्, विद्यापीठ गीत व महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. पदवीदान सोहळ्याच्या प्रारंभी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल वाचण्यात आला. यानंतर वरिष्ठ महाविद्यालय व अध्यापक महाविद्यालयातील एकूण ९१ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. तानाजीराव चोरगे यांनी विद्यार्थ्यांची बदलती मानसिकता, आधुनिक शिक्षणव्यवस्थेतील आव्हाने आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज याविषयी चिंतनपर विचार व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना समाजाभिमुख दृष्टिकोन ठेवून ज्ञानाचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी करण्याचे आवाहन केले.

या पदवीदान सोहळ्यास संस्थेचे संचालक मंडळ, सदस्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सृष्टी कदम यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा