You are currently viewing सावंतवाडी येथील “महामानव विश्वरत्नडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती उद्यान” चे नांव बदलण्यास विरोध

सावंतवाडी येथील “महामानव विश्वरत्नडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती उद्यान” चे नांव बदलण्यास विरोध

सावंतवाडी:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शीन पावन झालेल्या जेल नजिकच्या सावंतवाडी येथील स्मृति उद्यानास सावंतवाडी नगर परिषदेने सर्वाच्या संमतीने “महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती उद्यान “असे नांव दिलेले असून सदरच्या नांवास ‘समता प्रेरणा भूमी “असा बदल केल्याची दै. – तरुण भारत, सिंधुदुर्ग आवृत्ती च्या दिजांक-23 ऑक्टोबर, २०२६ च्या प्रतीवर उ‌ल्लेख करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे “समता प्रेरणा भूमी ” असे नामाभिकरण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव वगळण्याचा कृतीचा डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी संघटना कडून जाहिर निषेध करणेत येत आहे.

“महामानव विश्वरान डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृति उद्यान” या नावात कोणताही बदल करनेस आमचा जाहिर विरोध आहे व तसे निवेदन मा. नगराध्यक्ष सावंतवाडी नगरपरिषद, सावंतवाडी यांचेकडे यापूर्वीच देण्यात आलेले आहे.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती उद्यान या जागेचा नामउल्लेख जर ‘प्रेरणा भूमी ‘ झाला तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

समस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अनुयायी, सावंतवाडी

1. Adv. एस. व्ही. कांबळे

2. नारायण अरोंदेकर

3. लक्समण निगुडकर

प्रतिक्रिया व्यक्त करा