You are currently viewing पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदनाचा शासकीय समारंभ

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदनाचा शासकीय समारंभ

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदनाचा शासकीय समारंभ

 सिंधुदुर्गनगरी 

 महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या  हस्ते शुक्रवार, दिनांक 1 मे  2026 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहे.

ध्वजारोहणानंतर 8.25 वाजता पोलीस दल व राखीव पोलीस दलाचे संचलन होणार आहे. मुख्य शासकीय समारंभ सकाळी 8 वाजता असल्यामुळे इतर कार्यालये अगर संस्था यांनी आपल्या कार्यालयात ध्वजवंदनाचा कार्यक्रम सकाळी 7.15 पूर्वी किंवा सकाळी 9 वाजल्यानंतर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सभारंभासाठी उपस्थित मान्यवर व नागरिकांनी सकाळी 7.45 वाजेपर्यंत आपापल्या जागांवर स्थानापन्न व्हावे, तसेच राष्ट्रीय पोशाखात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा