You are currently viewing शिवराज्य ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष पदी चिन्मय राणे यांची निवड

शिवराज्य ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष पदी चिन्मय राणे यांची निवड

कणकवली :

 

शिवराज्य ब्रिगेड कणकवली तालुका प्रमुख पदी चिन्मय श्रीकृष्णकांत राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवराज्य ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुनील पारकर यांनी चिन्मय राणे यांना नियुक्तीचे पत्र देत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सामाजिक क्षेत्रातील आपल्या कार्यामुळे या पदावर आपली नियुक्ती करण्यात येत आहे. आपण आपले काम अधिक व्यापक रीतीने करून संघटना अधिक मजबूत करावी अशा शुभेच्छा त्यांना देण्यात आल्या. यावेळी शिवराज्य ब्रिगेड सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुनिल पारकर, शेखर राणे, भास्कर राणे, उल्हास तांडेल, संदेश पटेल, दिलीप घाडीगांवकर, दिपक राऊत, अनिल खोचरे हे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा