You are currently viewing आचरा भांडारवाडी येथे घरावर झाड कोसळल्याने २५ हजाराचे नुकसान

आचरा भांडारवाडी येथे घरावर झाड कोसळल्याने २५ हजाराचे नुकसान

मालवण

गेले दोन दिवस वादळी वाऱ्यासह कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज सोमवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास आचरा भंडारवाडी येथील मधुकर यशवंत मुणगेकर यांच्या राहत्या घराच्या पडवीवर माड कोसळ्याने पडवीचे सुमारे २५ हजाराचे नुकसान झाले आहे

गेले दोन तीन दिवस सातत्याने वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने आचरे भंडारवाडी येथील मधुकर यशवंत मुणगेकर यांच्या घराच्या पडवीवर माड कोसळला घरापासून काही अंतरावर असलेला हा माड कोसळला तेव्हा मुणगेकर कुटूंबीय हे घराच्या पुढच्या भागात झोपलेली होती त्यामुळे मुणगेकर कुटूंबीय हे बालबाल बचावले माड कोसळल्याने घराचे वासे, कौले लाकडी रिपा, पत्रे असे मिळून सुमारे २५ हजाराचे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यावर आचरा माजी सरपंच मंगेश टेमकर, तलाठी अनिल काळे पोलीस पाटील विठ्ठल धुरी, कोतवाल गिरीश घाडी यांनी घराची पाहणी करून झालेल्या नुकसानीची पंचायादी घालून माहिती महसूल विभागाला कळविली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + eleven =