You are currently viewing शिवाजी महाराज होते म्हणून आपण माणूस म्हणून जगलो – रुपेश पवार

शिवाजी महाराज होते म्हणून आपण माणूस म्हणून जगलो – रुपेश पवार

ठाणे :

 

साहित्यिक, पत्रकार एडवोकेट रुपेश पवार यांनी ठाण्यातील शारदा विद्या मंदिर या निवासी शाळेत तिथीनुसार शिवजयंतीचे आयोजन केले होते. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आपल्या व्याख्यानातून शिवचरित्र समजावून सांगितले. रुपेश पवारांनी व्याख्यान देताना भारताचा आणि महाराष्ट्राचा शिवकालीन इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. दहाव्या बाराव्या शतकातील सुलतानी आक्रमणापासून शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीपर्यंतचा इतिहास पवार यांनी संवादित केला. मुलांना कळेल, उमजेल अशा भाषेत त्यांनी हा ज्ञानयज्ञ केला. शेवटी रुपेश पवार यांनी सांगितले. हल्लीच्या काळात श्रीराम चरित्र, शिवाजी महाराजांचा इतिहास आणि आपल्या भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. शिवरायांच्या इतिहासातून आपण माणूस म्हणून कसे जगावे. आणि जन लोकांची काळजी कशी घ्यावी हे समजून घेता येते. याकरता हा इतिहास महत्त्वाचा आहे असे पवार यांनी सांगितले.

चैतन्य चॅरिटेबल ट्रस्टने हा कार्यक्रम घडवून आणला होता. रुपेश पवार हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. मुलांना शिवजयंतीच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास सांगता यावा याकरता हा प्रयत्न त्यांनी केला. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सहकार्य शारदा विद्या मंदिर शालेय समिती निमंत्रक सदस्य पत्रकार राजेंद्र गोसावी यांनी केले. या नियोजनामध्ये शारदा विद्या मंदिरच्या ज्ञानेश्रवर पाटील सरांचा वाटा महत्व पूर्ण होता. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एम व्ही. जाधव यांनी ही कार्यक्रमासाठी उत्तम सहकार्य केले यावेळी दिपाली बागुरे मॅडम कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन करून, या शिवजयंतीची शोभा वाढवली. या कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्यातले लोकप्रिय ज्येष्ठ उद्योगपती श्री नारायण पहलराय चांग हे होते. त्यांनी आपल्या संवादातून मुलांना आशीर्वाद दिले. चैतन्य चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका नेत्रा बारस्कर यांनी मुलांशी गोड संवाद साधत त्यांना जीवनविषयक, शिक्षण विषयक मार्गदर्शन दिले.

कार्यक्रमाच्या शेवटी जाधव मॅडम यांनी शारदा विद्या मंदिर शाळेच्या कामकाजाची माहिती दिली. अगदी व्रतस्थ राहुन ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कार्य करते आहे या त्यांच्या कार्यात जन सहभाग वाढावा यासाठी जनतेला मॅडमने मदतीचे आव्हान केले. झेप चॅनेलचे संचालक विनोद धांडे यांनी कॅमेरा मागे राहून कार्यक्रमाची उत्तम जबाबदारी सांभाळली या नियोजनामध्ये त्यांनी आपले सहकार्य दिले. यावेळी रुपेश पवार यांचे वडील बी. के पवार, आजोबा नथुराम जाधव शालेय समिती निमंत्रक सदस्य बाळकृष्ण म्हसकर तसेच सविता सोनावणे, अनिता कोळी, बाविस्कर सर सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

“छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून” हा या व्याख्यानाचा विषय होता. अतिशय कमीत कमी शब्दात संपूर्ण शिवाजी महाराजांचा इतिहास रुपेश पवार यांनी संवादबद्ध केला. त्यामुळे शिवाजी महाराजांचा जीवनपट 35 ते 40 मिनिटा संपन्न झाला. हा विषय मुलांना खूपच आवडला कारण तशा प्रकारच्या प्रतिक्रिया शिक्षकांना मिळाल्या.

यामुळे शिक्षकांच्या मनात उत्साह निर्माण झाला. अशा रीतीने रुपेश पवार यांनी प्रेरणादायी शिवाजी महाराजांचे चरित्र विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

यानंतर विद्यार्थ्यांना त्यांनी आपला अंतरंग हा जीवन विषयक आशादायी काव्यसंग्रह भेट म्हणून दिला. असा कार्यक्रम शिवस्मरणात संपन्न झाला. शारदा विद्या मंदिर शाळेला सहकार्याचा हात द्यावा त्याकरता संपर्क +918291449449 चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा