You are currently viewing माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्या माध्यमातून स.का. पाटील विद्यामंदीर केळुसच्या दहा विद्यार्थिनींना सायकल प्रदान..

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्या माध्यमातून स.का. पाटील विद्यामंदीर केळुसच्या दहा विद्यार्थिनींना सायकल प्रदान..

सिंधुदुर्ग

मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र संकल्पनेअंतर्गत जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग तर्फे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण यांचे सीएसआर निधीतून सायकल बँक अंतर्गत सायकल वाटप वितरण समारंभ दि. १७ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यातील स.का. पाटील विद्यामंदिर केळूस या प्रशालेमध्ये पार पडला. या कार्यक्रमात शाळेतील दहा मुलींना सायकल वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास श्री. शरद चव्हाण प्रदेश कार्यकारणी सदस्य, श्री. विलास हडकर, परिवर्तन केंद्र समन्वयक, श्री. प्रसन्ना देसाई जिल्हा सरचिटणीस, श्री. सुहास गवंडळकर तालुका अध्यक्ष वेंगुर्ले, श्री. प्रशांत खानोलकर तालुका सरचिटणीस त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते राजू पावसकर, संदीप तांडेल, सुजित केळुसकर, श्री शिवलकर, श्री वराडकर, केळुस हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. प्रकाश खोत व सर्व शिक्षक वर्ग तसेच सायकल लाभार्थी मुली व त्यांचे पालक उपस्थित होते.

कु. आचल आनंद केळुसकर या विद्यार्थिनीला  घनश्याम उर्फ नीलेश सामंत, माजी सभापती आरोग्य व शिक्षण विभाग सिंधुदुर्ग, यांचेमार्फत पाच हजार रुपये शैक्षणिक मदत देण्यात आली तसेच केळुस हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागल्याबद्दल भाजपच्या वतीने मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात  विलास हडकर,  शरद चव्हाण,  प्रसन्ना देसाई यांनी आपली मनोगते वेक्त केली व शुभेच्छा दिल्या. प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री. खोत सर यांनी सर्वांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा