You are currently viewing सावंतवाडी लायन्स क्लबच्या वतीने अभियंता दिन साजरा…

सावंतवाडी लायन्स क्लबच्या वतीने अभियंता दिन साजरा…

सावंतवाडी

येथील लायन्स क्लबच्या वतीने सर विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दीन साजरा करण्यात आला. यावेळी अभियंता दादा खोर्जवेकर, श्री.पारळे व महेश गोंधळेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष ला. ॲड. परिमल नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी लायन झेड. सी. ला. अशोक देसाई, सचिव ला. अमेय पई, खजिनदार ला. प्रसाद राऊत, उपाध्यक्ष ला. विद्याधर तावडे, ला. गजानन नाईक, ला. बाळ बोर्डेकर, ला प्रा. टकेकर सर, ला. रवी सावंत, ला. रोहित नाडकर्णी आदी लायन सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष ला. अँड नाईक यांनी अभियंता दिनाचे महत्व विषद करून सर्व अभियंत्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व सत्कार मूर्ती अभियंता दादा खोर्जवेकर, श्री. पारळे व महेश गोंधळेकर यांनी मनोगत व्यक्त केले आभार सचिव ला.अमेय पई यानी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − seven =