You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये एकाच दिवशी आठवडा बाजार भरवण्याचा प्रस्तावाबाबत व्यापारी संघटनांची उद्या कुडाळमध्ये महत्वाची बैठक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये एकाच दिवशी आठवडा बाजार भरवण्याचा प्रस्तावाबाबत व्यापारी संघटनांची उद्या कुडाळमध्ये महत्वाची बैठक

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये एकाच दिवशी आठवडा बाजार भरवण्याचा प्रस्ताव तालुका आणि ग्रामीण व्यापारी संघांच्या वतीने जिल्हा व्यापारी महासंघाकडे देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने या प्रस्तावावर विचार विनिमय करून पुढील दिशा ठरवण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ४२ बाजारपेठांतील प्रमुख व्यापारी पदाधिकारी व व्यापारी बांधवांची तातडीची विशेष व्यापक बैठक बुधवार दि. १९ ॲाक्टोबर रोजी दुपारी ३.३० वा. मराठा समाज सभागृह (ए.सी.हॅाल) कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे.

ॲानलाईन मार्केटींग कंपन्यांच्या अतिक्रमणामुळे स्थानिक व्यापारावर दुष्परिणाम होत आहे. याची माहिती घेवून-देवून यावर देखील उपाययोजना या बैठकीत निश्चित करण्यात येणार आहेत. तरी व्यापारी महासंघाच्या सर्व कार्यकारीणी सदस्य व संबंधित व्यापारी बांधवांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन व्यापारी महासंघाचे जिल्हा कार्यवाह नितीन वाळके यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − seventeen =