You are currently viewing वाफोली येथील श्री देवी माऊली मंदिराच्या उर्वरित बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देऊ –  महेश जाधव

वाफोली येथील श्री देवी माऊली मंदिराच्या उर्वरित बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देऊ – महेश जाधव

पश्चिम महाराष्ट्र देववस्थापन समितीकडे प्रस्ताव सादर करण्याच्या केल्या सूचना

बांदा :
वाफोली येथील श्री देवी माऊली मंदिराच्या उर्वरित बांधकामासाठी निधी उपलब्ध दिला जाईल. त्यासाठी रीतसर प्रस्ताव सादर करावा अशी सुचना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूरचे अध्यक्ष महेश जाधव यांनी वाफोली देवस्थान समितीला दिल्या.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूरच्या पदाधिकार्‍यांनी वाफोली मंदिराला भेट देत मंदिराची पाहणी केली. मंदिराच्या सुबक बांधकाम व चोख आर्थिक व्यवहाराबाबत अध्यक्ष महेश जाधव यांनी वाफोली देवस्थान समितीचे कौतुक केले. वाफोली देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, सदस्य संगिता खाडे, बसनगोंडा पाटील, प्रमोद पाटील, शिवाजीराव जाधव, सुभाष वोरा, विजय पोवार आदी पदाधिकारी तसेच वाफोली देवस्थानचे मानकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

वाफोली येथे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांचे स्वागत करताना वाफोली देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस. सोबत इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा